• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ranbir Kapoor : ‘धूम 4’ की ‘ॲनिमल पार्क’? ‘रामायण’ नंतर रणबीर कपूर कुठे झळकणार ?

July 27, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडचा हँडसम हंक, अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या महत्त्वाकांक्षी ‘रामायण’ चित्रपटामुळे सतत चर्चेत आहेत. नुकतंच त्याने दिग्दर्शक नितेश तिवारी, निर्माता नमित मल्होत्रा आणि सहकलाकार यश यांच्यासोबत सॅन दिएगो कॉमिक-कॉनमध्ये हजेरी लावत चित्रपटाचा जागतिक स्तरावर प्रचार केला. या कार्यक्रमादरम्यान रणबीरने अनेक विषयांवर तर संवाद साधलाच , पण आगामी चित्रपटांबद्दलही तो बोलला. गेल्या काही वर्षांपासून रणबीर कपूर ‘धूम 4’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, ‘रिव्ह्यू नेशन’ला दिलेल्या मुलाखतीत या अफवांवर स्वतः रणबीरच बोलला. त्यामुळे, त्याचा आगामी चित्रपट कोणता, याबद्दल चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

मुलाखतीदरम्यान सूत्रसंचालकाने यशच्या आगामी ‘टॉक्सिक: अ फेरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ चित्रपटाचा उल्लेख करत रणबीर ‘धूम 4’मध्ये दिसणार असल्याचे म्हटले. त्यावर रणबीरने तत्काळ स्पष्ट उत्तर दिलं. “नाही. सध्या मी फक्त ‘रामायण’ आणि संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटांवर काम करत आहे. ‘लव्ह अँड वॉर’ जानेवारी 2027 मध्ये प्रदर्शित होणार आहे” असं रणबीरने सांगितलं, मात्र धूम 4 बद्दल तो काहीच बोलला नाही. या एका वक्तव्यामुळे ‘धूम 4’ मध्ये रणबीरच्या एन्ट्रीच्या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळाला आहे.

‘ॲनिमल पार्क’ बाबतही मौन

विशेष म्हणजे, रणबीरने त्याच्या आगामी चित्रपटांचा उल्लेख करताना ‘ॲनिमल पार्क’चाही उल्लेख केला नाही. संदीप रेड्डी वांगा यांच्या 2023 मधील सुपरहिट ‘ॲनिमल’च्या सिक्वेलमध्ये रणबीर दिसणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, या प्रकल्पाबाबत रणबीरने काहीच भाष्य केलं नाही.

‘धूम 4’च्या चर्चांना कशी मिळाली हवा?

2024 मध्ये आलेल्या काही माध्यमांच्या अहवालांनुसार, निर्माता आदित्य चोप्रा यांना ‘धूम 4’साठी रणबीर कपूर सर्वात योग्य पर्याय वाटत असल्याचे म्हटलं गेलं होतं. त्यानंतर सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट आलिम हकीम यांनी रणबीरचा नवा लूक सोशल मीडियावर शेअर केला आणि चाहत्यांनी तो ‘धूम 4’ किंवा ‘अॅनिमल पार्क’ साठी असल्याचा अंदाज व्यक्त झाला. याचदरम्यान विकी कौशलच्या नावाचीही या प्रकल्पाशी चर्चा झाली होती. मात्र, यशराज फिल्म्सने अद्याप ‘धूम 4’ किंवा त्याच्या स्टारकास्टबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

‘धूम’ फ्रँचायझीचा यशस्वी प्रवास

2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धूम’ने बॉलिवूडमध्ये अॅक्शन फ्रँचायझीचा नवा ट्रेंड सुरू केला. पहिल्या चित्रपटात जॉन अब्राहम खलनायकाच्या भूमिकेत झळकले, तर अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिका साकारल्या. यानंतर ‘धूम 2’मध्ये ऋतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांच्या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली, तर ‘धूम 3’मध्ये आमिर खानच्या दुहेरी भूमिकेने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली.

‘रामायण’साठी मेकर्सची मोठी तयारी

नितेश तिवारी दिग्दर्शित आणि नमित मल्होत्रा निर्मित ‘रामायण’ हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक मानला जात आहे. चित्रपटाच्या प्रचारासाठी भारतासह परदेशातही भव्य कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून, जागतिक स्तरावर चित्रपट प्रदर्शित करण्याची तयारी सुरू आहे. ‘रामायण पार्ट 1’ दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरची चाहत्यांना मोठी उत्सुकता असून, तो 24 जुलै रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, काही कारणांमुळे ट्रेलरचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in