• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rajpal Yadav : 85 कोटींचा मालक तरही 9 कोटीसाठी पुन्हा तुरुंगात जाणार, राजपाल यादवसोबत काय घडलं?

July 12, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमधील आपल्या कमाल टायमिंग आणि विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता राजपाल यादव सध्या गंभीर कायदेशीर अडचणीत सापडला आहे. चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला ७ वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये प्रत्येकी ३-३ महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्याच्यावर एकूण ७.३५ कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. एवढी मोठी संपत्ती आणि कोट्यवधींचे चित्रपट प्रकल्प हातात असताना राजपाल यादवला केवळ काही कोटींसाठी तुरुंगात जावे लागत आहे का? असा प्रश्न अनेक चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार राजपाल यादवची एकूण संपत्ती ५० ते ८५ कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. चित्रपटांव्यतिरिक्त रिअल इस्टेट आणि विविध गुंतवणुकींतूनही त्याची मोठी कमाई होते. ब्रँड एंडोर्समेंटमधून त्याला वर्षाला ३० ते ३५ लाख रुपये मिळतात. त्याच्या ताफ्यात ऑडी आणि बीएमडब्ल्यू सारख्या लक्झरी गाड्या आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजपाल यादवची एकूण संपत्ती ५० ते ८५ कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. चित्रपटांव्यतिरिक्त रिअल इस्टेट आणि विविध गुंतवणुकींतूनही त्याची मोठी कमाई होते. ब्रँड एंडोर्समेंटमधून त्याला वर्षाला ३० ते ३५ लाख रुपये मिळतात. त्याच्या ताफ्यात ऑडी आणि बीएमडब्ल्यू सारख्या लक्झरी गाड्या आहेत.

सध्या तो एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये मानधन घेतात. 'भूल भुलैया ३' मधील 'छोटा पंडित' भूमिकेसाठी त्याने सुमारे १.२५ कोटी रुपये घेतले होते. तर आगामी 'वेलकम टू द जंगल'साठी १ ते २ कोटी आणि 'भूत बंगला'साठी १ ते १.५ कोटी रुपये फी घेतल्याची माहिती आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितले की सध्या त्यांच्याकडे १२०० कोटी रुपयांचे प्रकल्प रांगेत आहेत.

सध्या तो एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये मानधन घेतात. 'भूल भुलैया ३' मधील 'छोटा पंडित' भूमिकेसाठी त्याने सुमारे १.२५ कोटी रुपये घेतले होते. तर आगामी 'वेलकम टू द जंगल'साठी १ ते २ कोटी आणि 'भूत बंगला'साठी १ ते १.५ कोटी रुपये फी घेतल्याची माहिती आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितले की, सध्या त्यांच्याकडे १२०० कोटी रुपयांचे प्रकल्प रांगेत आहेत.

पॉडकास्टमध्ये बोलताना राजपाल यादवने या वादाचे स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला होता की हा केवळ ५ कोटी रुपयांचा मुद्दा असता तर तो २०१२ मध्येच संपला असता. पण या ५ कोटींमुळे माझे एकूण १७ कोटी रुपये बुडाले. आम्ही मिळून २२ कोटी रुपयांचा एक चित्रपट प्रकल्प सुरू केला होता. त्यात १२ कोटी रुपये खर्च झाले होते आणि ७० टक्के चित्रपट पूर्ण झाला होता. मात्र समोरच्या पक्षाच्या चुकीच्या हेतुमुळे हा प्रकल्प अर्ध्यावरच थांबला आणि चित्रपट बुडाला.

पॉडकास्टमध्ये बोलताना राजपाल यादवने या वादाचे स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला होता की, “हा केवळ ५ कोटी रुपयांचा मुद्दा असता तर तो २०१२ मध्येच संपला असता. पण या ५ कोटींमुळे माझे एकूण १७ कोटी रुपये बुडाले. आम्ही मिळून २२ कोटी रुपयांचा एक चित्रपट प्रकल्प सुरू केला होता. त्यात १२ कोटी रुपये खर्च झाले होते आणि ७० टक्के चित्रपट पूर्ण झाला होता. मात्र, समोरच्या पक्षाच्या चुकीच्या हेतुमुळे हा प्रकल्प अर्ध्यावरच थांबला आणि चित्रपट बुडाला.”

राजपाल यादवने विरोधकांवर जोरदार टीका केली. तो म्हणाला काही प्रकरणे पैशांसाठी नसतात तर केवळ जळफळाट आणि अहंकारातून निर्माण होतात. त्यांना माझ्या नावाचा वापर करून प्रसिद्धी हवी होती ती त्यांना मिळाली. आता हा वाद पूर्णपणे ईगोचा (अहंकाराचा) बनला आहे.

राजपाल यादवने विरोधकांवर जोरदार टीका केली. तो म्हणाला, “काही प्रकरणे पैशांसाठी नसतात तर केवळ जळफळाट आणि अहंकारातून निर्माण होतात. त्यांना माझ्या नावाचा वापर करून प्रसिद्धी हवी होती, ती त्यांना मिळाली. आता हा वाद पूर्णपणे ईगोचा (अहंकाराचा) बनला आहे.”

तडजोडीच्या शक्यतेबाबत विचारले असता त्याने स्पष्ट नकार दिला. तडजोड तेव्हाच होते जेव्हा दोन्ही बाजू समान असतात. इथे तर एका बाजूने पूर्ण कट रचला गेला होता. आता मी पूर्णपणे न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. न्यायालय जो निकाल देईल तो मला मान्य असेल असे राजपाल यादवने सांगितले.

तडजोडीच्या शक्यतेबाबत विचारले असता त्याने स्पष्ट नकार दिला. “तडजोड तेव्हाच होते जेव्हा दोन्ही बाजू समान असतात. इथे तर एका बाजूने पूर्ण कट रचला गेला होता. आता मी पूर्णपणे न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. न्यायालय जो निकाल देईल तो मला मान्य असेल,” असे राजपाल यादवने सांगितले.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kiara Advani: टॅक्सिक फेम कियाराचा कातिल अंदाज, फोटो पाहून चुकेल काळजाचा ठोका
  • Mulshi Pattern 2: मुळशीची बदनामी करून मोठे झाले, पैसा कमावला..; प्रवीण तरडेंवर मुळशीकरांचा आरोप, ‘मुळशी पॅटर्न 2’च्या नावाला विरोध
  • Vastu Tips : घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावताय? या दिशेला बिलकूल लावू नका
  • पाकिस्तान महिला क्रिकेटची वेगवान गोलंदाज आयमन अन्वरची निवृत्ती, कारण की..
  • कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in