
मुंबईत आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. येत्या 26 जुलैला रविवारी दोन्ही ठाकरे बंधु मोर्चा काढणार आहे. शिवाजी पार्क ते सिद्धविनायक मंदिर हा मोर्चा निघणार आहे. या पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी त्यांच्याकडे एक व्हायरल व्हिडिओ आलाय. त्याचा किस्सा सांगितला. “सरन्यायाधीशांमुळे झुरळ सुरु झालं. त्यांनी जन्म दिल्यानंतर या मुलाकडे बघायला नको का?. महाराष्ट्र पोलीस आंदोलनकर्त्यांना सहकार्य करतायत” असं राज ठाकरे म्हणाले. त्यानंतर त्यांनी व्हायरल व्हिडिओचा किस्सा सांगितला. “माझ्याकडे एक व्हिडिओ आलाय. पोलिसांच्या गाडीतून त्या मुलांना घेऊन चाललेले. त्यात एक पोलीस त्या मुलाला म्हणतोय पुन्हा दिसलास तर 50 ग्रॅमची पावडर टाकेन. आता पोलिसांकडे पावडर पण मिळायला लागली, पोलीस ड्रग्स सप्लायर आहेत का? काय चाललय मला कळत नाही.साधी गोष्ट आहे. ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी राजीनामा द्यावा. परत असं होणार नाही याची शाश्वती द्यावी. हे सगळं इथपर्यंतच आहे” असं राज ठाकरे म्हणाले.
(बातमी अपडेट होत आहे)
Leave a Reply