• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rain: भिजपावसातही शेताचे होते डबके? कुजतात पिके? मग हा उपाय कराच

July 9, 2026 by admin Leave a Comment


Waterlogged in farm: अल निनोला वाकुल्या दाखवत पावसाने दिमाखात सुरूवात केली. शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. पाऊस आल्यानंतर शेतकरी आनंदून जातो. पण या आनंदाबरोबरच एक चिंताही त्याला सतावते. मुसळधार पावसानेच नाही तर अगदी काही तासांच्या भिजपावसाने, रिमझिममुळे सुद्धा काहींच्या शेतात पाणी थांबते. शेताचे पार डबके होते. पिके कुजण्याची भीती निर्माण होते. पिके खराब होण्यास हा पाऊस कारणीभूत ठरत नाही. जमिनीचा पोतही तितकाच कारणीभूत ठरतो.

रासायनिक खतांच्या वापरामुळे जमीन होते कठीण

उत्पादन वाढीसाठी गेल्या काही वर्षात शेतात युरिया, डीएपी या रासायनिक खतांचा वारेमाफ वापर सुरू आहे. यामुळे जमिनीची गुणवत्ता रसातळाला गेली आहे. जमिनीचा पोत खराब झाला आहे. रासायनिक खतांच्या अतिरेकामुळे जमिनीतील सुक्ष्मजीव नष्ट होत आहेत. जमीन भुसभुशीत होण्याऐवजी ती कठीण झाली आहे.

शेताचे होते मग डबके

रसायनांच्या अतिरेकामुळे जमीन कठीण होते. पावसाचे पाणी सहजपणे जमिनीत मुरत नाही. पाणी शेतात साचते. पिकांच्या मुळांना आवश्यक ऑक्सिजन मिळत नाही. पिके हळूहळू कोमेजतात. करपतात आणि जळून जातात.

एकदम घरगुती उपाय

शेताला डबकं होऊ द्यायचे नसेल तर रासायनिक खताला पर्याय शोधणे आवश्यक आहे. नैसर्गिक शेती जमिनीला नवीन जीवदान देते. जीवामृत, घनजीवामृत आणि इतर नैसर्गिक पद्धतीचा वापराने जमिनीतील सूक्ष्मजीव पुन्हा सक्रिय होतात. नैसर्गिक खतामुळे जमिनीचा पोत सुधारतो. जमिनीची गुणवत्ता सुधारते. तिची सुपिकता टिकते.

गांडूळ म्हणजे जमिनीचे नैसर्गिक अभियंते

नैसर्गिक शेतीत गांडुळाला महत्त्व आहे. गांडुळामुळे जमीन भुसभुशीत होते. जमिनीत छोटी छोटी छिद्रे तयार होतात. जमीन स्पंजासारखी होते. मुसळधार पावसाचे पाणीही झरकन जमिनीत मुरते. ते पाणी पृष्ठभागावर थांबत नाही. जमिनीत मुरते.

रासायनिक शेतीमुळे जमिनीची पाणी शोषून घेण्याची क्षमता संपते. तर नैसर्गिक शेतीमुळे जमीन भुसभुशीत होते. पाणी साठवण्याची क्षमता वाढते. पाणी पातळी वाढते. शेतातील ओल टिकून राहते. अति पाण्याचा निचरा झाल्याने पिकांचे कोणतेही नुकसान होत नाही. पिक नष्ट होत नाही. त्याची मूळं सडत नाहीत. ज्या ठिकाणी अतिवृष्टी होते अथवा रसायनांचा अतिरेक झाल्याने शेतात पाणी साठते. त्याठिकाणी नैसर्गिक शेतीकडे वळणे हा सर्वात चांगला उपाय मानल्या जातो. पिक वाढीसाठी आणि अधिक उत्पादनासाठी नैसर्गिक खतांचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते.

डिस्क्लेमर: विविध स्त्रोतांवरून शेतकऱ्यांसाठी ही माहिती देण्यात आली आहे. TV9 मराठी या माहितीला दुजोरा देत नाही. शेतीतज्ज्ञ अथवा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, माहितीगाराची मदत नक्की घ्या.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in