• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rahuri By Poll Election | राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का; बडा नेता थेट भाजपात प्रवेश करणार

April 17, 2026 by admin Leave a Comment


राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना सध्या वेग आला आहे. 20 तारखेला ते आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी तनपुरे कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार असून, त्यानंतर पुढील राजकीय निर्णय जाहीर केला जाणार आहे. राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि नेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, “माझी भूमिका हीच कार्यकर्त्यांची भूमिका असेल,” असं स्पष्ट करत त्यांनी पुढील निर्णय विचारपूर्वक घेणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे 20 तारखेला तनपुरे नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर, शरद पवार गटाला हा सर्वात मोठा धक्का असेल. प्राजक्त तनपुरे यांच्या या भूमिकेवर शरद पवार यांची नेमकी प्रतिक्रिया काय येते, हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बॉलिवूडमधील 5 प्रचंड अश्लील गाणी, जी ऐकताच वाटते लाज, शेवटचं गाणं तर प्रचंड चर्चेत
  • महागड्या फेशियलची गरज नाही, रोज फक्त ५ मिनिटे करा हा उपाय
  • Vinod Kambli Health Update : विनोद कांबळीची प्रकृती आता कशी? पत्नीने जे सांगितलं ते ऐकून..
  • तुमच्या कारच्या काचेवर काळे ठिपके का असतात? आजच अर्थ समजून घ्या
  • म्हणून मी कधी मसाज करुन घेत नाही, कारण महिलेच्या स्पर्शाने सुद्धा मी..सलमानच्या हिरॉईनने सांगितल्या मनातल्या भावना

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in