• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rahul Gandhi: मेट्रो, रस्ते, दुकानं बंद करा, पण… मोदींचे नाव घेत राहुल गांधी यांनी अखेर तो वार केलाच

July 25, 2026 by admin Leave a Comment


Rahul Gandhi Attacks PM Modi On Paper Leak: गेल्या दोन दिवसात पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी देशातील तरुण, विद्यार्थी आणि आंदोलकांशी इन्स्टाग्रामसह इतर प्लॅटफॉर्मवरून संवाद साधला आहे. NEET प्रश्नपत्रिका फुटीवर त्यांनी सरकारची बाजू मांडली. सरकार करत असलेल्या उपाय योजनाची माहिती दिली. त्याचवेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यातून त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. यामुळे नीट पेपरफुटीपासून ते सीजेपीच्या आंदोलनापर्यंत राजकारण तापले आहे. सरकारला कोंडीत पकडण्याचा जोरकस प्रयत्न सुरू असून अनेक मुद्यांवर सरकार बॅकफुटवर आल्याचे समोर आले आहे.

मेट्रो, रस्ते, दुकानं बंद करा, पण…

धर्मेंद्र प्रधान यांना का पाठीशी घातले जात आहे असा सवाल विरोधकांसह CJP ने केला आहे. यावरून राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. “मेट्रो बंद केली. रास्ते बंद केले. दुकानं बंद केली. इंटरनेट बंद केले. जेवणही बंद केले. आपला हक्क , अधिकार मागणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात सरकारने पावलं टाकली. केवळ एक गोष्ट बंद करू शकले नाही, मोदीजी- प्रश्नपत्रिका फुट” असा सणसणीत टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. राहुल गांधींच्या या टीकेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. तर जंतर मंतरवरील गर्दी अजूनही हटलेली नाही.

कॉक्रोच जनता पार्टीसोबत चर्चेची एक फेरी झाली आहे. तर दुसरी फेरी अजून बाकी आहे. CJP शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम असल्यानेही सरकारची डोकेदुखी वाढली आहे. शुक्रवारी विट्ठल हाऊसमध्ये सीजेपी आणि सरकारच्या प्रतिनिधींमध्ये दोन तास बैठक झाली. काही मुद्यांवर सरकारने सहमती दर्शवली आहे. सरकारची सकारात्मक प्रतिक्रिया आली आहे. आज, शनिवारी दुपारी 3.30 वाजता पुन्हा सरकार आणि सीजेपी यांच्या दरम्यान बैठक होणार आहे.

मेट्रो बंद करो।
रास्ते बंद करो।
दुकानें बंद करो।
Internet बंद करो।
खाना बंद करो।

अपना हक़ मांग रहे छात्रों के ख़िलाफ़ सरकार ने ये क्रूर कदम उठाए।

बस एक चीज़ बंद नहीं कर पाए, मोदी जी – पेपर लीक।

— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 25, 2026

पंतप्रधान मोदींनी पुन्हा साधला तरुणाईशी संवाद

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एक व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. त्यांनी त्यात प्रश्नपत्रिका फुटीवर कडक कायदा आणण्याचे आश्वासन दिले आहे. त्यावर राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे. आम्ही अगोदरच संसदेत याविषयी चर्चा करण्याची आग्रही मागणी केली होती, याची आठवण त्यांनी करून दिली. तर कालही मोदी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सरकारची बाजू मांडली. याचा सकारात्मक परिणामही दिसला आहे. त्यांच्या फॉलोअर्सची संख्या वाढली आहे. पण मोदी प्रधानांच्या राजीनाम्याविषयी इतके मौन का? असा सवाल विरोधकांनी केला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in