
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री उशिरा पेपर लीकच्या मुद्यावर विद्यार्थ्यांना संबोधित केलं. सोशल मीडियावर एक व्हिडिओ संदेश जारी केला. या संदेशावर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘आमचे विद्यार्थी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत आहेत’ असं राहुल गांधी यांनी पीएम मोदींच्या व्हिडिओ संदेशावर म्हटलं आहे. “या पथॅटिक अर्ध्यारात्रीच्या व्हिडिओवरुन त्यांच्या इंटेलिजेंसचा अपमान करु नका. प्रधान यांना बर्खास्त करा, विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांना शिक्षा द्या आणि माफी मागा” अशी मागणी राहुल गांधी यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन केली आहे.
(बातमी अपडेट होत आहे)
Leave a Reply