• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

टॅक्सी, रिक्षा चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

August 27, 2026 by admin Leave a Comment


राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजबी मराठी भाषा शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही घोषणा केली. रिक्षा आणि टॅक्सी चालकाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन ही विनंती केली होती. त्यामुळे त्यांना ही मुदतवाढ देण्यात आली आहे, असंही त्यांनी सांगितलं. या वर्षभरात अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी शिकलं पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. रिक्षा आणि ऑटो चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आल्याने त्यांच्यावर आता वर्षभर कोणतीही कारवाई होणार नाही.

हाजी अराफत यांच्या नेतृत्वात ऑटो आणि रिक्षा चालकांनी आज माझी भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने जुजबी मराठी आली पाहिजे याचं समर्थन केलं. मराठी शिकण्याचा आमचा प्रयत्नही सुरू आहे. भविष्यातही प्रयत्न करत राहू, असंही त्यांनी सांगितलं. मात्र, वेगवेगळ्या वयातील रिक्षा, टॅक्सी चालकांना कमी वेळात मराठी शिकता येणार नाही. त्यासाठी आम्हाला वेळ द्यावा, अशी त्यांनी विनंती केली. किमान मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याची मागणी त्यांनी केली. त्यामुळे या अमराठी रिक्षा आणि ऑटोचालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

कारवाई होणार नाही

रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या वर्षभरात त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. एक वर्षात क्लासेस लावून किंवा मराठी साहित्याचा अभ्यास करून ही संघटना रिक्षा आणि टॅक्सीचालकांना जुजबी मराठी शिकवतील. रिक्षाचालक आणि ऑटो चालकांचं शिष्टमंडळ समोरून आलं. त्यांनी विनंती केली. वेळ वाढवून मागितली. त्यामुळे वेळ देणं आवश्यक होतं. त्यानुसार त्यांना एक वर्षाची मुदत वाढवून दिली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सावधान… नेपाळमध्ये पुन्हा जलप्रलय होणार? 72 तासात आणखी एक ग्लेशियर फुटणार? ओव्हरफ्लो सुरू
  • मुंबई पालिकेवर आता शिंदे गटाचा महापौर? मोठा बदल होण्याची शक्यता, महायुतीत काय घडतंय?
  • Sonal Dinusha: सर्वाधिक धावा आणि शतकं तरीही सोनल दिनुषासोबत अन्याय! नेमकं काय घडलं?
  • Devendra Fadnavis : मराठी शिकण्यास रिक्षाचालकांना मुदतवाढ, सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला
  • स्वीमिंग पूल, जिम, स्पा, हेलिपॅड आणि… घर नव्हे महालात राहतो हा उद्योगपती, अंबानींपेक्षाही …

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in