• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सावधान… नेपाळमध्ये पुन्हा जलप्रलय होणार? 72 तासात आणखी एक ग्लेशियर फुटणार? ओव्हरफ्लो सुरू

August 27, 2026 by admin Leave a Comment


नेपाळमध्ये काल जलप्रलय झाल्यानंतर संपूर्ण देशात हाहाकार माजला आहे. हे संकट अजून संपलेलं नसतानाच नेपाळवर दुसरं संकट घोंघावत आहे. चीनच्या सीमेजवळचा एक बॅरिअर लेक येत्या 72 तासात कोसळू शकतो. त्यामुळे पुन्हा एकदा नेपाळमध्ये महाप्रलय होऊ शकतो, असा इशारा चीनच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. हा लेक चोचेन खोला आणि पुरेपू सांगपो नद्यांच्या संगमावर आहे. याच ठिकाणी महाप्रलयाला सुरुवात होणार असल्याने त्याकडे चीनचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत.

चीनची सरकारी ब्रॉडकास्यट सीसीटीव्ही रिपोर्टनुसार, बीजिंगच्या अधिकाऱ्यांनी हिमालयाच्या सीमेजवळच्या क्रॉसिंगजवळच्या वरच्या भागात एक बॅरिअर लेकशी संबंधित धोका मार्क केला आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा ग्लेशियर तुटण्याची शक्यता असून तिथे बचाव कार्य करणं अत्यंत कठिण असल्याचं म्हटलं आहे. सरकारी मीडियानुसार, चीनच्या जलसंसाधन मंत्रालयाने, आपत्ती स्थळ आणि उत्तर पूर्वेकडील चोचेन खोला आणि पुरेपू त्सांगपो नद्यांच्या संगमावरील असलेल्या या लेकवर विशेष लक्ष केंद्रीत केलं असून त्याच्याशी संबंधित माहिती मिळवण्यास सुरुवात केली आहे. मोठी दुर्घटना रोखण्यसााठी आणि वेळीच मदत कार्य करता यावं यासाठी या अधिकाऱ्यांनी संबंधित लेकवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.

जलस्तर वाढणार, अलर्ट राहा

सीसीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, गुरुवारी म्हणजे आज या बॅरियर लेकमध्ये 20 लाख क्युबिक मीटर पाणी असल्याचं आढळून आलं आहे. हे पाणी ओव्हरफ्लो होत आहे. सध्याचं हवामान पाहता येत्या तीन दिवसात या लेकमध्ये 30 लाख क्युबिक मीटर पाणी येऊ शकतं. त्यामुळे बांध तुटण्याची भीती अधिक वाढणार आहे. त्यामुळे नेपाळमध्ये पुन्हा एकदा मोठा हाहाकार उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे चीनी अधिकाऱ्यांनी येत्या 72 तासासाठी अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे.

तिबेटमध्ये 558 लोक बेपत्ता

या नव्या संकटाच्या आधीच नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवार भीषण भूस्खलन आणि महापुराने मोठा हाहाकार उडवला आहे. तिबेटमधील कमीत कमी 558 लोक बेपत्ता आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार, नेपाळच्या सीमेतील 100 चीनी नागरिक बेपत्ता आहेत. बुधवारी सकाळी अचानक विनाशकारी पूर आला. त्यामुळे नेपाळमध्ये कमीत कमी 332 लोकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो लोक अजूनही बेपत्ता आहेत. घरं, रस्ते आणि विजेचे पोल सर्व वाहून गेले आहेत.

युद्धस्तरावर मदतकार्य सुरू

धघोका पाहता संवेदनशील भागातील गावं रिकामी करण्यातआले आहेत. चीनने मदत कार्यासाठी बीजिंग आणि चेंगदूहून विशेष अग्निशमन आणि बचाव पथक पाठवलं आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने हे मदत कार्य केलं जाणार आहे. दरम्यान, जिइरोंग येथील केंद्रीय शहरातील काही भागात वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. पण बंदर काठच्या भागात अजूनही अंधार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Floods : नेपाळनंतर आता भारतावर मोठं संकट, प्रशासनाचा हाय अलर्ट; एनडीआरएफ, एसडीआरएफ अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • राखी बांधताना हे गाणं ऐकलं नाही तर रक्षाबंधनच अपूर्ण ! 61 वर्षांपूर्वीचं गीत आजही तितकंच लोकप्रिय
  • मॅच ड्रॉ होताच टीम इंडिया संकटात, आता या 2 टीम फायनलच्या शर्यतीत; भारतासोबत काय गेम झाला?
  • समलैंगिक डेटिंग ॲपवरून झाली ओळख, भेटीसाठी घरी आला अन् लाखोंचा गंडा… डोंबिवलीत नेमकं काय घडलं ?
  • मृणाल कुलकर्णी यांचं सून शिवानीसोबत कसं आहे नातं? जाणून म्हणाल अशी सासू सगळ्यांना भेटो….

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in