• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

स्वीमिंग पूल, जिम, स्पा, हेलिपॅड आणि… घर नव्हे महालात राहतो हा उद्योगपती, अंबानींपेक्षाही …

August 27, 2026 by admin Leave a Comment


देशातील सर्वात महागड्या घरांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे मुंबईतील अँटिलिया हे घर सर्वात वरच्या क्रमांकावर येतं. याशिवाय भारतातील टॉप-10 महागड्या घरांच्या यादीत त्यांचे धाकटे बंधू अनिल अंबानी यांच्यासह देशातील अनेक दिग्गज उद्योगपतींच्या आलिशान घरांचा समावेश आहे. असेच एक प्रसिद्ध उद्योगपती म्हणजे रेमंड समूहाचे गौतम सिंघानिया (Gautam Singhania). त्यांचं घर हे अनिल अंबानी यांच्या ॲबोड या घरापेक्षाही महाग असल्याचं म्हटलं जातं. (All photos : Social Media)

भारतातील दुसरं सर्वात महागडं घर – भारतीय फॅब्रिक आणि फॅशन रिटेलर रेमंड समूहाचे चेअरमन गौतम सिंघानिया यांच्या घराचं नाव जे.के. हाऊस (JK House) आहे. मुंबईतील अल्टामाउंट रोडवरच हे निवासस्थान आहे, जिथे रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचं जगप्रसिद्ध अँटिलिया देखील आहे. सिंघानिया यांच्या या घराचा देशातील 10 सर्वात महागड्या घरांच्या यादीत दुसरा क्रमांक असल्याचं बोललं जातं.

30 मजले… किंमत 6,000 कोटी रुपये – मुंबईतील सर्वात पॉश परिसरांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अल्टामाउंट रोडवर असलेलं हे JK House म्हणजे भारतातील सर्वात उंच खासगी इमारतींपैकी एक आहे. JK House सुमारे 145 मीटर उंच आणि 30 मजली इमारत असल्याचं सांगितलं जातं. या इमारतीचा प्रत्येक मजला आलिशान पद्धतीने सजवण्यात आला आहे. किंमतीबाबत बोलायचं झाल्यास, विविध रिपोर्ट्सनुसार, या इमारतीची अंदाजे किंमत 6,000 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं.

अनिल अंबानींच्या घरापेक्षाही महागडं – गौतम सिंघानिया यांच्या सुमारे 6 हजार कोटी रुपये किमतीच्या या JK House ची किंमत मुकेश अंबानी यांचा भाऊ बंधू अनिल अंबानी यांच्या Abode या घरापेक्षाही अधिक असल्याचे सांगितलं जातं. अनिल अंबानी यांच्या Abode ची अंदाजे किंमत 5,000 कोटी रुपये आहे. ही 17 मजली इमारत मुंबईतील पाली हिल परिसरात असून सुमारे 16,000 चौरस फूटांवर पसरली आहे.

पूल, स्पा, हेलिपॅड आणि आलिशान सुविधा – गौतम सिंघानिया यांच्या घरात एकाहून एक अशा सरस, आलिशान सुविधा आहेत. इमारतीच्या प्रत्येक मजल्याला राजेशाही स्वरूप देण्यात आलंय. वरच्या मजल्यांवर प्रत्येक स्तरावर हिरवीगार बाग आणि गार्डन तयार आहे. एवढंच नव्हे तर JK House मध्ये दोन स्विमिंग पूल, हेलिपॅड, स्पा, जिम तसेच मनोरंजनासाठी विविध सुविधा असल्याचं अनेक रिपोर्ट्समध्ये नमूद करण्यात आलंय.

गौतम सिंघानिया यांना कार्सचीही आवड – रेमंडचे प्रमुख गौतम सिंघानिया यांच्या या घराचा आतील भाग जितका भव्य आहे, तितकीच ही इमारत बाहेरूनही आलिशान दिसते. JK House च्या 30 मजल्यांपैकी सुरुवातीचे पाच मजले त्यांच्या शानदार कार कलेक्शनच्या पार्किंगसाठी राखीव असल्याचे सांगितले जाते. रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या कार कलेक्शनमध्ये Lamborghini Gallardo LP570 Superleggera, Lotus Elise Convertible, Nissan Skyline GT-R, Ferrari 458 Italia आणि Audi Q7 यांसारख्या अनेक आलिशान गाड्यांचा समावेश आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश
  • Amitabh Bachchan : अख्खं जग विसरलात तरी चालेल पण… विवाहीत पुरूषांना बिग बींनी काय दिला कानमंत्र ?
  • IND vs SL Test: भारत श्रीलंका दुसरा कसोटी सामना ड्रॉ, पण नोंदवले गेले इतके सारे विक्रम; काय ते जाणून घ्या
  • मुदतवाढ मिळाली तरी अमराठी चालकांना मराठी शिकावीच लागेल; मंत्री प्रताप सरनाईकांनी ठणवाकवलं
  • Abhijit Dipke : अभिजीत दिपके यांच्या CJP ने निवडणूक लढवली तर किती मतदान होणार? सर्व्हेतून धक्कादायक माहिती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in