• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rahul Gandhi | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!

July 25, 2026 by admin Leave a Comment


नीट पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाला मोठं यश मिळाल्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या घडामोडीनंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करत ही लोकशाहीची मोठी जीत असल्याचं म्हटलं आहे.

राहुल गांधी म्हणाले की, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हे महत्त्वाचं आणि प्रतीकात्मक पाऊल आहे. देशभरातील विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरून लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांसाठी लढा दिला. या आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं आणि तरुणाचं मी मनापासून अभिनंदन करतो. देशातील विद्यार्थ्यांवर आम्हाला अभिमान आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

तसेच, शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं. मात्र, आंदोलनातील दोन प्रमुख मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

राहुल गांधी यांनी पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांचा आणि देशाच्या भविष्याचा सन्मान राखत सार्वजनिकरित्या माफी मागावी, अशी मागणी केली. तसेच आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर हिंसाचार करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही त्यांनी मागणी केली.

पुढे बोलताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका करत, केवळ विद्यार्थीच नव्हे तर शेतकरी, मजूर, गरीब आणि समाजातील अनेक घटकांवर अन्याय झाल्याचा आरोप केला. संविधानिक मार्गाने आपल्या हक्कांसाठी ठामपणे उभं राहणं हेच खरं साहस असल्याचं सांगत, देशात बदल घडवून आणण्याची वेळ आली असल्याचंही राहुल गांधी यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in