• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Raghav Chadha : राघव चड्ढा-परिणीती यांच्या संपत्तीत मोठा फरक, त्याची नेटवर्थ 50 लाख तर बायकोच्या संपत्तीचा आकडा ऐकून डोळे विस्फारतील

April 25, 2026 by admin Leave a Comment


आम आदमी पार्टीने अलीकडेच राघव चड्ढा यांना डेप्युटी लीडर पदावरुन हटवलं होतं. राज्यसभेत त्यांच्या बोलण्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. तेव्हापासून राघव चड्ढा आम आदमी पार्टीचा राजीनामा देणार अशी चर्चा सुरु झालेली. आता अखेर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार परिणीत चोपडा आणि राघव चड्ढा यांची एकूण संपत्ती जवळपास 74.5 कोटी रुपये आहे. पती-पत्नीच्या संपत्तीत मोठा फरक आहे. या रिपोर्ट्नुसार परिणीतीकडे राघव चड्ढापेक्षा जास्त पैसा आहे. त्यांच्या संपत्तीत जास्त वाटा परिणीतीचा आहे.

रिपोर्टनुसार परिणीतीची संपत्ती जवळपास 74 कोटींची आहे. राघवने जाहीर केलय त्यानुसार त्याच्याकडे घर, कार, सोनं, बॉन्ड आणि शेअर या आधारावर अंदाजित संपत्ती 50 लाख रुपये आहे.

परिणीती चोपडाने फिल्मी करिअर आणि पर्सनल ब्रांडच्या आधारावर ही संपत्ती कमावली आहे. रिपोर्टनुसार, तिची एकूण संपत्ती 74 कोटी रुपये आहे. वांद्रे येथे तिचं 22 कोटी रुपयाचं घर सुद्धा आहे. तिच्याकडे लग्जरी कार्सचं शानदार कलेक्शन आहे. मनीकंट्रोलच्या रिपोर्टमध्ये हे म्हटलं आहे.

परिणीतीच्या कार्सबद्दल बोलायचं झाल्यास या लिस्टमध्ये 1.30 कोटी रुपयांची रेंज रोवर वोग, 43.19 लाखाची ऑडी क्यू 4 आणि 69.27 लाखाची ऑडी क्यू 7 आहे. रिपोर्टनुसार परिणीती फोर्ब्स इंडियाच्या सेलिब्रिटी 100 लिस्टमध्ये सुद्धा होती. डेब्यू एन्ट्रीच्यावेळी तिचा अंदाजित वार्षिक इनकम 5.36 कोटी रुपये होतं.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sanjay Raut : ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजलं ना…आप पक्षाच्या फुटीवर राऊतांची खरमरीत टीका… म्हणाले, अचानक हे लोक होलसेलमध्ये….
  • मी थांबणार नाही, कुणाच्याही… संजय निरुपम यांचेही थेट आव्हान; कुणाकडे रोख
  • अक्षय कुमारच्या लेकीचे नग्न फोटो मागणाऱ्या विरोधात कठोर कारवाई, पोलिसांकडून मोठी अपडेट समोर
  • RCB vs GT : गुजरातच्या या प्लेयरवर बसला विलनचा ठप्पा, त्याच्यामुळे पहिल्याच चेंडूवर RCB विरुद्ध हरली टीम
  • Devendra Fadnavis | मराठीच्या सक्तीवरून मनसे-शिंदे गटाची जुंपली, भैय्यांना हिसका; मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in