• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Devendra Fadnavis | मराठीच्या सक्तीवरून मनसे-शिंदे गटाची जुंपली, भैय्यांना हिसका; मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया काय?

April 25, 2026 by admin Leave a Comment


मुंबईसह महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्ती करण्याच्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापलं आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे विविध पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, हा मुद्दा आता राजकीय वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला असून, 1 मेपासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने आक्रमक भूमिका घेत या निर्णयाच्या समर्थनार्थ इशारा दिला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, “मुंबई आणि महाराष्ट्रात मराठीचा आग्रह धरणं चुकीचं नाही.” तसेच, ज्या रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी येत नाही, त्यांना मराठी शिकवण्याची तयारी सरकारकडून असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. “महाराष्ट्रात मराठीला प्राधान्य देणं हे स्वाभाविक आहे. मात्र, या मुद्द्यावरून अनावश्यक वाद निर्माण होऊ नये,” असं सांगत सरकारची भूमिका शांततेची असल्याचंही फडणवीस यांनी अधोरेखित केलं.
या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून, पुढील काही दिवसांत या मुद्द्यावरून संघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बिनडोकपणाचा कळस… मुलीवर वाईट नजर नको म्हणून बापाने थेट… जे काही घडलं त्याने अमरावती पुन्हा हादरली
  • त्याने मला घट्ट पकडलं, कार सुरु केली आणि…, मुंबईच्या रस्त्यांवर मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार
  • Sanjay Dutt Wife Manyata : चित्रपटाच्या घोषणेचा कार्यक्रम पण अचानक काय झालं, संजू बाबाच्या पत्नीला इवेंटमध्ये सर्वांसमोर कोसळलं रडू
  • सावधान! ITR मध्ये चुकीची माहिती भरली तर 200 टक्के दंड, आयकर विभागाचे नवीन नियम लागू
  • Bageshwar Baba: चार मुलं पैदा करा आणि एक… RSS चा उल्लेख करत हिंदू धर्मीयांना धीरेंद्र शास्त्री यांचे मोठे आवाहन काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in