• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Raghav Chaddha meets PM Modi : परिणीती चोप्राचा नवरा राघव चड्ढांना भाजपंमध्ये महत्वाच्या जबाबदारीचे संकेत, आज सकाळीच मोदींना भेटले

August 8, 2026 by admin Leave a Comment


काही महिन्यांपूर्वी आम आदमी पार्टी सोडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या खासदार राघव चड्ढा यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राघव चड्ढा यांनी या भेटीचे फोटो एक्सवर शेअर करुन ही एक स्मरणीय सकाळ असल्याचं म्हटलं आहे. पंजाब विधानसभा निवडणुका काही महिन्यांनी आहेत. त्या आधी झालेल्या या भेटीमुळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. शुक्रवारी शिरोमणि अकाली दलचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. या वर्षाच्या सुरुवातीला आपच्या सहा खासदारांनी बंडखोरी करत भाजपमध्ये प्रवेश केला. यात राघव चड्ढा सुद्धा होते. पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली ते चड्ढा यांनी सांगितलं नाही, पण ज्ञानवर्धक चर्चा झाल्याच सांगितलं.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याचं सौभाग्य लाभलं. ही एक विस्तृत आणि ज्ञान वाढवणारी चर्चा होती. त्यांची अमूल्य वेळ आणि त्यांच्याकडून जे शिकायला मिळालं, मार्गदर्शन यासाठी मी त्यांचा मनापासून आभारी आहे” असं चड्ढा यांनी सांगितलं. भाजपने पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय हालचाली वाढवलेल्या असताना चड्ढा आणि पंतप्रधानांची ही बैठक होत आहे. पंजाबमध्ये पुढच्यावर्षी निवडणुका होणार आहेत. चड्ढा राज्यसभेचे खासदार आहेत.राज्यसभेवर ते पंजाबचं प्रतिनिधीत्व करतात. जालंधरशी त्यांची कौटुंबिक नाळ जोडलेली आहे. पंजाब निवडणुकीत त्यांना महत्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

A morning I will cherish.

Had the privilege of meeting Hon’ble Prime Minister Shri @narendramodi Ji. A detailed and enriching interaction. Deeply grateful for his generous time and for the opportunity to benefit from his insights and guidance. 🇮🇳 pic.twitter.com/4A5cEwVCNg

— Raghav Chadha (@raghav_chadha) August 8, 2026

राघव चड्ढा अजून चर्चेत असण्यामागचं कारण काय?

राघव चड्ढा सुरुवातीपासून आपशी संबंधित होते. पण एप्रिल महिन्यात त्यांनी सर्वांनाच धक्का देत भाजपमध्ये प्रवेश केला. ते आप सोडतायत यावर सुरुवातीला कोणाचा विश्वास बसला नाही. पण त्यांनी अरविंद केजरीवालांची साथ सोडली. राघव चड्ढा यांची पत्नी परिणीती चोप्रा प्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्यामुळे सुद्धा ते नेहमी चर्चेत असायचे. राघव चड्ढा यांना पंजाबच्या राजकारणाचा चांगला अभ्यास आहे. मृतसर, लुधियाना आणि जालंधर सारख्या शहरात त्यांच्या माध्यमातून भाजपला आपली पकड मजबूत करता येऊ शकते. शिरोमणि अकाली दल भाजपचा जुना मित्र पक्ष होता. पण ते आता भाजपपासून लांब गेलेत.

 





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
  • Nagpur : नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
  • Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in