• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Pune Mhada Lottery : म्हाडाची लॉटरी आली रे! स्वीमिंग पूल, पार्किंग ते जीम, वाचा 634 घरं नेमकी कुठं असणार?

July 21, 2026 by admin Leave a Comment


Pune Mhada Lottery : आजकाल प्रत्येकालाच आपले स्वत:चे घर असायला हवे असे वाटते. स्वत:चे घर हे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न काहीचे सत्यात उतरते तर काही लोकांना आयुष्यभर हक्काचे घर घेताच येत नाही. आजकालची महागाई आणि घर बांधणीसाठी लागणारा खर्च लक्षात घेता घराचं स्वप्न पूर्ण होणं जवळपास अशक्य असल्याचे वाटत आहे. परंतु राज्य सरकारकडून म्हाडाच्या माध्यमातून शहरी भागात अत्यंत स्वस्त अशा घरांची विक्री केली जाते. या घरांसाठी कधी एकदा लॉटरी निघते याची लाखो लोक वाट पाहात असतात. दरम्यान, आता म्हाडामध्ये घर घेण्याची इच्छा बाळगणाऱ्यांना एक मोठी खुशखबर समोर आली आहे. म्हाडाने पुणे मंडळासाठी लॉटरी जाहीर केली आहे.

म्हाडाने नेमका काय निर्णय घेतला?

मिळालेल्या माहितीनुसार म्हाडाच्या पुणे मंडळाने एकूण 634 सदनिकांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. त्यासाठीची जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. या घरांची सोडत संगणकीय प्रणालीद्वारे होणार आहे. ताथवडे, पुणे (Pune) येथील टप्पा–2 येथे ही 634 घरे असणार आहेत. या सोडतीअंतर्गत जी घरे मध्यम उत्पन्न गटातील आहेत, त्या घरांसाठी उत्पन्नाची अट शिथील करण्यात आली आहे. त्यामुळे ही घरे घेण्यासाठी अर्ज करणाऱ्यांना दिसाला मिळणार आहे.

याआधी एप्रिल महिन्यात निघाली होती जाहिरात

याआधी पुणे मंडळने एप्रिल 2026 मध्ये ताथवडे टप्पा–२ अंतर्गत २४ सदनिका अल्प उत्पन्न गट (LIG) व ७६८ सदनिका मध्यम उत्पन्न गट (MIG) अशा एकूण ७९२ सदनिकांच्या विक्रीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

नव्या जाहिरातीत काय काय सुविधा असणार?

दरम्यान, म्हाडाने आणलेल्या या नव्या लॉटीरमधील घरांना चांगली सुविधा देण्यात आली आहे. या सदनिकांसाठी चारचाकी वाहनांची पार्किंग असेल. तसेच स्विमिंग पूल, क्लब हाऊस, इनडोअर गेम्ससाठी परिसर, मुलांना खेळण्याची जागा, ओपन जीम, ऑन ग्रीड सोलार प्रमाणाली, ईव्ही चार्जिंग सुविधा, रेन वॉटर हार्वेस्टिंग अशा सुविधा असणार आहेत. याव्यतिरिक्त या सदनिकांच्या इमारतीत इतरही बऱ्याच सुविधा आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
  • Nagpur : नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
  • Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in