
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर प्रकाश टाकला. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या गद्दारांची शिवसेना या टीकेला प्रत्युत्तर देताना सरनाईक म्हणाले की, गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे सर्वसामान्य जनतेनेच दाखवून दिले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनतेने ६३ आमदार निवडून दिले आहेत, असे त्यांनी नमूद केले.
एसटी महामंडळाच्या संदर्भात, त्यांनी गणेशोत्सवासाठी कोकणवासियांसाठी ५२०० विशेष बस सेवांची घोषणा केली. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जुन्या व भंगार झालेल्या गाड्या स्क्रॅप करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, येत्या दोन-तीन महिन्यांत ५००० बसेस भंगारमध्ये टाकल्या जातील असे सांगितले.
मीरा रोडमधील पर्युषण पर्वात मांस विक्री बंदीच्या मागणीवर बोलताना, खाण्या-पिण्याचे स्वातंत्र्य वैयक्तिक असून, अशा बाबींमध्ये सरकारने हस्तक्षेप करू नये, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. पुण्यात डीजेच्या मुद्द्यावरून झालेल्या वादावर ते म्हणाले की, कायद्याच्या चौकटीत राहून डेसिबल मर्यादा पाळणे आवश्यक आहे. रिक्षाचालकांना मराठी भाषा येण्याची अट कायम असून, एक वर्षाची मुदतवाढ असली तरी कायदा रद्द केलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
Leave a Reply