• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Salman Khan : कॅमेरा समोर येण्याची गरजच नाही…सलमान खानचा पारा चढला ! नक्की काय घडलं?; VIDEO व्हायरल

September 4, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानची (Salman Khan) लोकप्रियता अजूनही तितकीच जबरदस्त आहे. मोठ्या पडद्यावर आपल्या दमदार व्यक्तिमत्त्वाने चाहत्यांना भुरळ घालणारा हा दबंग स्टार, छोट्या पडद्यावरही तितकाच लोकप्रिय आहे. ‘बिग बॉस’ त्याचा बहुचर्चित रिॲलिटी शोपुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘बिग बॉस 20’च्या प्रीमियर एपिसोडच्या शूटिंगला सुरुवात झाली असून, सलमान खान सेटवर पोहोचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला.

काउबॉय लूकमध्ये सलमानची एन्ट्री

‘बिग बॉस 20’च्या सेटवर अभिनेता सलमान खान यावेळी खास काऊबॉय लूकमध्ये दिसला. नेहमीप्रमाणेच त्याच्या एंट्रीने पापाराझींचे लक्ष वेधून घेतले. तो येताचा कॅमेऱ्यांचा लखलखाट सुरू झाला. सलमानने पापाराझींच्या कॅमेऱ्यासमोर अनेक पोझ दिल्या आणि त्यांच्याशी संवादही साधला. मात्र याच दरम्यान असं काही घडलं, की सलमानच्या रागाचा पारा चढल्याचं दिसून आलं.

नेमकं काय घडलं ?

बिग बॉसच्या सेटवर सलमान जेव्हा कॅमेऱ्यांसाठी पोझ देत होता, तेव्हाच अचानक एक व्यक्ती कॅमेऱ्याच्या पुढून दुसऱ्या दिशेला जाण्याचा प्रयत्न करत होता. ते सलमानच्या नजरेस पडलं, आणि त्याने तिथल्या तिथे त्या व्यक्तीला सुनावलं. ‘पापा… हे तुझं काम नाहीये पापा. कॅमेऱ्यासमोर येण्याची गरजच नाही,’ अशा शब्दांत सलमानने त्याला फटकारलं.

हे प्रकरण तिथेच थांबलं नाही. त्यानंतर आणखी एक व्हिडीओ समोर आला, ज्यामध्ये सलमान खान हा पापाराझींवर नाराज झालेला दिसला. त्याचं लक्ष वेधण्यासाठी काहीजण मोठ्याने आवाज देत होते. पण सलमानला ते काही रुचलं नाही आणि त्याने त्यांना शांत राहण्यास सांगितलं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

रागानंतर सलमानचा चिल अंदाज

असं असलं तरी या छोट्याशा प्रसंगानंतर मात्र सलमानचा मूड पुन्हा निवांत झालेला दिसला. त्याने पापाराझींशी अगदी शांतपणे संवाद साधला. इतकंच नव्हे तर शेवटी सलमानने त्यांच्यासोबत फोटोही काढून घेतले. त्यामुळे सलमानचा राग आणि त्यानंतरचा चिल अंदाज दोन्ही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.

भाईजानचा अंदाज पाहून काय म्हणाले नेटकरी?

सलमान भडकल्याचा हा व्हिडीओ अवघ्या काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावर चाहत्यांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या. काही चाहत्यांना त्याचा हा अंदाज आवडला, तर राखी सावंतनेही सलमानच्या या स्टाइलचे कौतुक केल्याचं दिसून आलं.

मात्र, काही सोशल मीडिया युजर्सनी सलमानच्या सततच्या ‘अँग्री’ मोडबाबत नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी काही चाहत्यांचे लक्ष सलमानच्या तब्येतीकडेही गेले. व्हिडिओमध्ये तो काहीसा थकलेला आणि कमजोर दिसत असल्याचे काही युजर्सनी म्हटलं. अनेक चाहत्यांनी त्याच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली.

सलमानच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर बिग बॉसनतर तो डायरेक्टर वामशी पैदिपल्ली च्या पुढल्या चित्रपटात दिसेल. पुढल्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगेंच्या लढ्याला सर्वात मोठं यश, सरकारने तडकाफडकी घोषणा केली, विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर!
  • भाजी कापण्याच्या सुरीने आईवरच पोटच्या मुलाचे सपासप वार, धक्कादायक घटनेने महाड हादरले…
  • राज्यात लवकरच नवं ऑपरेशन टायगर, शिंदेंच्या बड्या मंत्र्याने थेट सांगितलं; राजकीय वर्तुळात एकच चर्चा!
  • Photographer Murder Case : त्याचा 20 दिवसांपूर्वीच मृत्यू, तरी गर्लफ्रेंडसोबत सुरू होती रोमँटिक चाटिंग, सत्य समोर येताच पोलीसही हादरले; काय घडलं?
  • Salman Khan : कॅमेरा समोर येण्याची गरजच नाही…सलमान खानचा पारा चढला ! नक्की काय घडलं?; VIDEO व्हायरल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in