• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Prashant Ambi | ऑडिओ क्लिप मान्य तरी अटक का नाही? प्रशांत अंबींचा पोलिसांना खडेबोल सवाल

May 24, 2026 by admin Leave a Comment


आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकी प्रकरणाला आता कायदेशीर आणि राजकीय वळण मिळालं आहे. या प्रकरणात प्रशांत अंबी यांनी पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित करत थेट उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणात दखलपात्र गुन्हा दाखल व्हावा, यासाठी प्रशांत अंबी संघर्ष करत असल्याचं सांगितलं जात आहे.

या पार्श्वभूमीवर न्यायालयाने घेतलेल्या भूमिकेबद्दल प्रशांत अंबी यांनी समाधान व्यक्त करत न्यायालयाचे आभार मानले आहेत. मात्र, पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता निष्पक्ष आणि पारदर्शक तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांच्याकडून कथित धमकीचा फोन आल्याचा आरोप करण्यात आला असून, संबंधित ऑडिओ क्लिपही चर्चेत आली आहे. या प्रकरणावर बोलताना प्रशांत अंबी यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा उल्लेख करत पोलिसांच्या तपास पद्धतीवर टीका केली. “पानसरे प्रकरणात अद्याप न्याय मिळालेला नाही. किमान या प्रकरणात तरी पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करावी,” असं ते म्हणाले.

तसेच, “आरोपीने स्वतः ऑडिओ क्लिप मान्य केली असताना पोलिसांकडून अजून कसली चौकशी सुरू आहे?” असा सवाल करत संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Monsoon Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पुढील 24 तासात..
  • Horoscope Today 23rd June 2026 : धनलाभ, करिअरमधलं यश आणि प्रेमातील मोठे संकेत; आज तुमची रास काय सांगते?
  • उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
  • Tata Sierra EV ‘या’ दिवशी होणार लॉन्च, शक्तिशाली QWD डुअल मोटरसह टीझर रिलीज
  • शिवसेना शिंदे गटात येण्याची घोषणा करण्यापूर्वी नेमकं काय घडलं? ओमराजेंबाबत खळबळजनक माहिती समोर, रात्री दोन वाजता…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in