• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Prasad Lad | मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! प्रसाद लाड यांचा मोठा दावा; म्हणाले…

August 7, 2026 by admin Leave a Comment


माध्यमांशी संवाद साधताना भाजप नेते प्रसाद लाड यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. मनोज जरांगे यांच्यासोबत आपली चर्चा झाली असून, त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे लाड यांनी सांगितले.

“मी असेपर्यंत मनोज जरांगे यांच्यावर उपोषणाला बसण्याची वेळ येऊ देणार नाही,” असा दावा प्रसाद लाड यांनी केला. जरांगे पाटील उपोषणाला बसले, तर समाजातील हजारो लोक त्यांच्या समर्थनार्थ उपोषणाला बसतात आणि त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, असेही त्यांनी म्हटले.

यावेळी प्रसाद लाड यांनी मराठा समाजालाही आवाहन केले. “जोपर्यंत हा तुमचा भाऊ आहे, तोपर्यंत मनोज जरांगे यांना उपोषण करावे लागणार नाही,” असे म्हणत त्यांनी जरांगे यांच्या आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर मंत्री उदय सामंत यांच्यासोबतही चर्चा सुरू असल्याची माहिती प्रसाद लाड यांनी दिली. या चर्चेतून नेमका काय निर्णय होतो आणि मराठा आरक्षणाच्या मागण्यांबाबत सरकारकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Abhijeet Dipke: तू ये तर तुझा खेळ संपवून टाकतो आणि कायमचाच… अभिजीत दिपके यांना मिळाली धमकी
  • शाळेत हिजाब घालावा की घालू नये? कोर्टाचा मोठा निर्णय; थेट इस्लामचा उल्लेख
  • Shweta Tiwari: श्वेता तिवारीचं मुंबईतील आलिशान घर! ग्लास डोअर, सुंदर बाल्कनी अन् खास रीडिंग कॉर्नरने वेधलं लक्ष
  • अभिजीत दीपकेंच्या मनातील बेस्ट CM कोण? पटकन नाव सांगितलं, कारण देत म्हणाले…
  • धक्कादायक, धावत्या बसमध्ये महिलेच्या अंगावर लघुशंका करण्याचा किळसवाणा प्रकार, महाराष्ट्रातील घटना

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in