
अभिनेत्री पूजा भट्टने वडिल महेश भट्ट यांच्या 'डॅडी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. अलीकडेच पूजा भट्टने एका मुलाखतीत सांगितलं की, डॅडी फ्लॉप झाल्यानंतर तिने चित्रपटांमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला होता. पूजा भट्ट म्हणाली की, वडिलांनी त्यावेळी मला 'आशिकी' चित्रपटासाठी विचारलं होतं. पण मीच तो चित्रपट रिजेक्ट केला.
बॉयफ्रेंडमुळे 'आशिकी'चित्रपट मी रिजेक्ट केला होता. या बद्दल सविस्तर बोलताना पूजा म्हणाली की, त्यावेळच्या माझ्या प्रियकराला मी अभिनेत्री व्हावं हे पसंत नव्हतं. मी अभिनय करावा अशी माझ्या प्रियकराची इच्छा नव्हती. म्हणून पूजा भट्टने आशिकीची ऑफर धुडकावली.
'आशिकी' चित्रपटासाठी मला विचारणा झालेली. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आणि शेवटची वेळ माझे काका मुकेश भट्ट नोटांची बंड्डल घेऊन माझ्या घरी आलेले. ही तुझी सायनिंग अमाउंट आहे असं त्यांनी सांगितलं. पण मी त्यांना म्हणाले की, मी आता ठरवलय, यापुढे मी अभिनय करणार नाही.
मी त्यावेळी प्रेमात होते. मी चित्रपट क्षेत्रात काम करावं हे माझ्या प्रियकराला आवडत नव्हतं. तिने हे सुद्धा स्पष्ट केलं की, बॉयफ्रेंडने कधी मला स्पष्टपणे अभिनय सोडं असं सांगितलं नव्हतं. मला फक्त एक चांगली प्रेयसी बनायचं होतं. म्हणून मी चित्रपटांपासून लांब राहण्याचा निर्णय घेतलेला.
माझ्या या निर्णयानंतर काका मुकेश भट्ट यांनी वडिलांना फोन केला. ते माझ्या वडिलांना म्हणाले की, मुलगी वेडी झाली आहे. चित्रपटासाठी नकार देतेय. पूजा जेव्हा तिचे वडिल महेश भट्ट यांच्यासोबत बोलली, त्यावेळी फोनवर फक्त श्वासाचे आवाज ऐकू येत होते. महेश भट्ट तिच्या या निर्णयावर खूप नाराज होते.




Leave a Reply