• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

PM Modi SCO Summit : पीएम मोदींनी बॉडी लँग्वेजमधून पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफना दाखवली लायकी, ग्रुप फोटोच्यावेळी काय घडलं?

September 1, 2026 by admin Leave a Comment


पंतप्रधान नरेंद्र मोदी बिश्केक येथे 26 व्या शांघाय सहकार्य संघटना SCO शिखर सम्मेलनात सहभागी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिथे दुसऱ्या देशांच्या नेत्यांची उत्साहाने भेट घेतली, त्यांचं स्वागत केलं. याच परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ सुद्धा सहभागी झाले आहेत.पण मोदींनी त्यांच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. रिपोर्ट्सनुसार पंतप्रधान मोदी जेव्हा जागतिक नेत्यांना भेटत होते, उत्साहाने त्यांच्याशी चर्चा करत होते. त्यावेळी पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ सुद्धा तिथे होते. पण मोदींनी पाकिस्तानी पंतप्रधानांकडे पाहिलं सुद्धा नाही. त्याआधी SCO समीटमध्ये पीएम मोदींची किर्गिस्तानचे राष्ट्रपती सादिर जापारोव यांच्यासोबतही बैठक झाली.

बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारत-किर्गिस्तान संबंधात कितपत प्रगती झालीय याचा आढावा घेतला. दोन्ही देशांमध्ये रणनितीक सहकार्य अजून भक्कम करण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. ग्रुप फोटोच्यावेळचे जे फोटो आणि व्हिडिओ समोर आलेत, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियन राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांना जास्त उत्साहाने भेटताना दिसले. त्याचवेळी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी सुद्धा पीएम मोदींनी उत्साहाने हस्तांदोलन केलं. या महिन्यात भारतात शिखर सम्मेलन होणार आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि रशियन राष्ट्रपती पुतिन या परिषदेसाठी भारतात येतील अशी अपेक्षा आहे. दोन मोठ्या शिखर परिषदालागोपाठ होणं हा दुर्मिळ योग आहे.

From the SCO Summit in Bishkek. pic.twitter.com/GDlPpVkSLR

— Narendra Modi (@narendramodi) September 1, 2026

 

 

Watch: Indian PM Modi, Chinese Prez Xi have a Hi5-handshake at SCO Bishkek Summit pic.twitter.com/03gtgMCMKO

— Sidhant Sibal (@sidhant) September 1, 2026

‘भारत माता की जय’

किर्गिस्तान मध्य आशियातील देश आहे. रविवारी SCO समीटसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिश्केकमध्ये आल्यानंतर भारतीय समुदायाने त्यांचं जोरदार स्वागत केलं. पीएम मोदींनी एक्सवर एक पोस्ट केली. बिश्केकमध्ये आज भारतीय समुदायाने खास स्वागत केलं. भारतीय समुदायाच्या नागरिकांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’ च्या घोषणा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत केलं.

 





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीवर भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बहिष्कार, समोर आलं मोठं कारण
  • खतरनाक सीरिज, एकदा सुरुवात केली तर शेवटपर्यंत बघतात लोक, प्रत्येक भाग सुपरहिट, फ्रीमध्ये बघत आहेत लोक
  • MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
  • देशी ब्रँडची युकेत धमाकेदार एण्ट्री, लाँच केला 5000mAh बॅटरी आणि 50MP सेल्फी कॅमेरा फोन
  • अभिजीत दीपकेंचा सर्वात मोठा विजय, सरन्यायाधीशांनी दाखवली पॉवर, सीजेपीची दुसरी मागणी मान्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in