• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

PM Modi चा पहिलाच न्यूझीलंड दौरा ठरला गेमचेंजर, 40 वर्षानंतर भारताचे पंतप्रधान तिथे गेले, याआधी जे जमलं नाही ते शक्य केलं

July 11, 2026 by admin Leave a Comment


पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूझीलंड दौऱ्यावर आहेत. तब्बल 40 वर्षानंतर भारताचा कुठला पंतप्रधान न्यूझीलंड दौऱ्यावर गेला आहे. त्यामुळे हा दौरा ऐतिहासिक आहे. ऑकलंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूझीलंडच्या पंतप्रधानांना भेटले. दोन्ही देशांमध्ये 18 करार झाले. यात 10 MOU आणि 8 मोठ्या घोषणा आहेत. या निर्णयांमुळे आता भारत आणि न्यूझीलंडच्या संबंधांना स्टॅटजिक पार्ट्नरशिपचा दर्जा मिळाला आहे. संरक्षण, समुद्री सुरक्षा, व्यापार, कृषी, शिक्षण, खेळ आणि संस्कृती या क्षेत्रात आता दोन्ही देश मिळून काम करतील. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनच्या वाढत्या प्रभावाला काउंटरबॅलन्स म्हणून याकडे पाहिलं जात आहे. मोदींचा हा न्यूझीलंड दौरा गेमचेंजर ठरला आहे. स्टॅटजिक पार्ट्नरशिपचा दर्जा ही मोठी बाब आहे. याआधी जे घडलं नव्हतं ते शक्य झालं आहे.

सर्वात महत्वाचा करार संरक्षण आणि समुद्री सुरक्षेसंदर्भात झाला. भारत आणि न्यूझीलंडचं सैन्य आता समुद्री सुरक्षेसंदर्भात माहितीचं आदान-प्रदान करतील. संयुक्त युद्ध अभ्यास करतील. समुद्राशी संबंधित नकाशे आणि हायड्रोगाफीचा डेटा शेअर करण्यावर दोन्ही देशांमध्ये एकमत झालं आहे. समुद्र मार्गाची सुरक्षा अजून चांगली होईल. अजून एक करार झालाय. त्यामध्ये दोन्ही देशांची नौदलं गरज पडल्यास एकमेकांना लॉजिस्टिक सपोर्ट देतील.

स्ट्रॅटजिक पार्टनरशिपचा दर्जा मिळणं हे यश

भारत आणि न्यूझीलंडने मिळून दहशतवादाविरुद्ध एक संयुक्त कार्य समूह बनवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देश दहशतवादाशी संबंधित माहिती परस्परांना शेअर करतील. मिळून रणनिती आखतील. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातही दोन्ही देशांनी करार केलाय. भूकंप, सुनामी आणि दुसऱ्या नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी अनुभव आणि टेक्नोलॉजी शेअर केली जाईल. मोदींच्या दौऱ्याचं यश म्हणजे दोन्ही देशांच्या संबंधांना स्ट्रॅटजिक पार्टनरशिपचा दर्जा मिळणं. भारत आणि न्यूझीलंड आता संरक्षण, व्यापार, कृषी, शिक्षण, संस्कृती आणि इंडो-पॅसिफिक सारख्या क्षेत्रात आता मिळून दीर्घकाळ काम करतील.

भारतीयांना न्यूझीलंड माहितीय तो क्रिकेटसाठी

दोन्ही देशांनी 2030 पर्यंत व्यापार 7 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्टय ठेवलं आहे. भारत आणि न्यूझीलंडमध्ये मुक्त व्यापार करार FTA झाला आहे. यामुळे दोन्ही देशांच्या उत्पादनांना अनेक करांमधून सवलत मिळेल. त्याचा फायदा व्यापार वाढीत होईल. भारताला न्यूझीलंड देश माहित आहे तो क्रिकेटसाठी. भारतीयांना न्यूझीलंड क्रिकेटमधील अनेक दर्जेदार खेळाडू माहित आहेत. पर्यटनासाठी सुद्धा भारतीय मोठ्या प्रमाणात न्यूझीलंडला जातात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in