• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

PM Modi : अन्य कुठल्याही पुरस्कारापेक्षा पीएम मोदींचा स्लोवाकियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान ही खूप खास बाब का आहे?

June 16, 2026 by admin Leave a Comment


स्लोवाकियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘द ऑर्डर ऑफ़ द व्हाइट डबल क्रॉस (फर्स्ट क्लास)’ पुरस्काराने सन्मानित केलं आहे. हा स्लोवाकियामधील सर्वोच्च पुरस्कार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला हा 33 वा जागतिक पुरस्कार आहे. स्लोवाकियाकडून त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने मोदींचा सन्मान होण ही खूप खास बाब आहे, कारण स्लोवाकियाच्या दौऱ्यावर जाणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. यापूर्वी भारताच्या कुठल्याही पंतप्रधानाने स्लोवाकियाचा दौरा केलेला नाही. अशावेळी पहिल्याच दौऱ्यात मोदींचा स्लोवाकियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान होणं ही खूप खास बाब आहे. स्लोवाकिया हा युरोपमधला एक छोटसा देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या युरोप दौऱ्यावर आहेत. ते आधी फ्रान्सला गेले, त्यानंतर स्लोवाकियाला.

स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी यांनी ब्रातिस्लावा येथे एका खास सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार प्रदान केला. हा सन्मान त्या परदेशी नेत्यांना दिला जातो, जे स्लोवाकियासोबत द्विपक्षीय संबंध मजबूत करणं, मैत्री वाढवतात. या पुरस्काराबद्दल पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर लिहिलय की, “ब्रातिस्लावा मध्ये ‘द ऑर्डर ऑफ द व्हाइट डबल क्रॉस (फर्स्ट क्लास)’ पुरस्कार मिळाल्यानंतर मनात एक सन्मानाची निर्माण झाली आहे. या पुरस्कारासाठी स्लोवाकियाची जनता आणि त्यांच्या सरकारचे आभार. हा सन्मान 140 कोटी भारतीयांचा आहे. भारत आणि स्लोवाकियाच्या अतूट मैत्रीला मी हा पुरस्कार समर्पित करतो”

किती करार झाले?

‘द ऑर्डर ऑफ़ द व्हाइट डबल क्रॉस (फर्स्ट क्लास)’ हा स्लोवाकियाकडून खास परदेशी नागरिकांना दिला जाणारा सर्वोच्च नागरिक आणि सैन्य राजकीय सन्मान आहे. पीएम मोदी एक आठवड्याच्या युरोप दौऱ्यात ब्रातिस्लावा मध्ये आहेत. व्यापार वाढवण्यासाठी भारताने युरोपवर लक्ष केंद्रीत केलं आहे. युरोपियन बाजारपेठेला डोळ्यासमोर ठेऊन रणनिती आखली जात आहेत. भारत आणि स्लोवाकियाने द्विपक्षीय व्यापार आणि संरक्षण सहकार्य वाढवण्याचा संकल्प केला आहे. पीएम मोदी आणि स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यात झालेल्या चर्चेत हे ठरलं. दोन्ही देशांनी प्रवासन, डिजिटल टेक्नोलॉजी आणि डिफेन्स सारख्या क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी 11 करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ
  • Uric Acid problem: सांधेदुखीला कारण नॉनव्हेज?, रेड मीटने युरिक एसिडची पातळी वाढते, जाणून घ्या…
  • PM Kisan Yojana:… तर खात्यात 4,000 रुपये जमा होणार… ती चूक दुरुस्त केली का? पीएम किसान योजनेची मोठी अपडेट
  • ईद-ए-मिलाद मिरवणूकीनिमित्त मुंबईतील वाहतूकीत मोठा बदल, कोणते मार्ग बंद ते पाहा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in