• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

PM मोदी ॲक्शन मोडमध्ये! मंत्र्यांना इन्स्टाग्रामबाबत मोठा आदेश, कॅबिनेट मीटिंगमध्ये काय घडलं?

July 24, 2026 by admin Leave a Comment


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यांना जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. बेल्लारी–गुंटकल रेल्वे मार्गाच्या नव्या रेल्वे लाईनसाठी 1,264 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. विकसित भारत या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी अशा रेल्वे प्रकल्पांची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे अशीही माहिती समोर आली आहे. तसेच या बैठकीच्या शेवटी पंतप्रधानांनी मंत्र्यांना एक महत्त्वाचा आदेश दिला असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

दोन मोठे निर्णय

आजच्या बैठकीत केमिकल क्षेत्रासाठी 3,030 कोटी रुपयांच्या नव्या योजनेलाही मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत तीन केमिकल पार्क उभारले जाणार असून, प्रत्येक पार्कसाठी 1,000 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. या योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे. तसेच केमिकल पार्कचे नियोजनबद्ध पद्धतीने बांधकाम करण्यात येईल. प्रत्येक केमिकल पार्कमध्ये उभारल्या जाणाऱ्या उद्योग प्रकल्पांची गुंतवणूक 15,000 ते 20,000 कोटी रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.

पेपर लीक दुरुस्ती विधेयकाविषयी चर्चा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत अमित शाह यांनी पेपर लीक दुरुस्ती विधेयकाविषयी सविस्तर माहिती दिली. अमित शाह यांच्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनीही या विधेयकाविषयी आणखी काही मुद्दे मांडले. ते असेही म्हणाले की, राजीव गांधींच्या कार्यकाळात काँग्रेस सरकारने असा कायदा आणण्याबद्दल चर्चा केली होती, पण तो कधीच आणला नाही. या मोदी सरकारने 2024 मध्ये हा कायदा आणला.

मंत्र्यांना मोठा आदेश

मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या शेवटी पंतप्रधान मोदींनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांना केवळ एक्स (X) वरच नव्हे, तर इन्स्टाग्रामवर अधिक सक्रिय होऊन आपले फॉलोअर्स वाढवण्यास आणि सरकारी योजनांची माहिती शेअर करण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधान म्हणाले की, इन्स्टाग्रामवर तरुणांची संख्या खूप जास्त आहे आणि तरुण इन्स्टाग्रामवर अधिक सक्रिय असतात, त्यामुळे इन्स्टाग्रामवर योजनांची माहिती दिली गेल्यात ती प्रभावी ठरेल. पंतप्रधानांनी हेही स्पष्ट केले की, याच कारणामुळे त्यांनी काल रात्री आपला व्हिडिओ संदेश इन्स्टाग्रामच्या व्हिडिओ शैलीत शेअर केला होता.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in