• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

PM मोदींच्या मंत्रिमंडळात मोठी उलथापालथ; केंद्रीय शिक्षण मंत्रि‍पदाची जबाबदारी मिळताच प्रल्हाद जोशींची महत्वाची प्रतिक्रिया

July 26, 2026 by admin Leave a Comment


नीट पेपरफुटीवरून सुरू झालेल्या आंदोलनाने धर्मेंद्र प्रधान यांना मोठा धक्का दिला. जेन-झी आंदोलन देशभर पसरताच पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात मोठी उलथापालथ झाली. धर्मेद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर प्रल्हाद जोशी यांना केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाची जबाबदारी मिळाली. नवी जबाबदारी मिळाल्यानंतर प्रल्हाद जोशी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. नवीन केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. मी माझं कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडेन आणि पंतप्रधानांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, अशी प्रतिक्रिया प्रल्हाद जोशी यांनी दिली.

प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं की, ‘मी ही जबाबदारी विनम्र भावनेने स्वीकारतो. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. माझ्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मी पंतप्रप्रधान मोदींच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल’. यावेळी जोशींनी मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळाचा उल्लेख केला. तसेच 12 वर्षांच्या काळात ऐतिहासिक कामगिरी झाल्याचा दावा त्यांनी केला. त्यांनी माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळाचं देखील कौतुक केलं.

‘गेल्या 4 ते 5 वर्षांत धर्मेंद्र प्रधान यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी महत्वपूर्ण पावले उचलली. आता नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम करणयाचा प्रयत्न करणार. मी शिक्षण मंत्रि‍पदाची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडेन’, असे ते म्हणाले.

कोण आहेत प्रल्हाद जोशी?

प्रल्हाद जोशी हे अनेक वर्षांपासून कर्नाटकाच्या राजकारणात सक्रिय आहे. ते 2004 पासून धारवाड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यांनी 2004 साली पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या बीएस पाटील यांचा पराभव केला. जोशींनी 2014 ते 2016 सालापर्यंत कर्नाटकात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून जोशी यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. ते 1992 ते 1994 साली ईदगाह मैदानात तिरंगा फडकवण्याासाठी आंदोलन केल्याने चर्चेत आले होते. त्यांनी राजकीय प्रवासाच्या सुरुवातीच्या काळात ‘काश्मीर बचाव’ आंदोलन देखील केलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन…
  • घरातील फॅमिली फोटो बदलू शकतो नात्यांमधील आनंद, फोटो लावताना ‘या’ 10 गोष्टी ठेवा लक्षात
  • साखरेच्या दरवाढीमागे इथेनॉल नाही तर ‘ही’ कारणे, सरकारने घेतलेले मोठे निर्णय काय?
  • मोहन भागवत यांच्या न्यूयॉर्कमधील कार्यक्रमात सहभागी व्हा, संघाचे प्रचारप्रमुख सुनिल आंबेकर यांचे आवाहन
  • श्रावणातील पुत्रदा एकादशीला चुकूनही करू नका ‘या’ 5 गोष्टी, भात खाण्यापासून तुळस तोडण्यापर्यंत आहे सक्त मनाई

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in