
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा येत्या 29 ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कमध्ये भव्यदिव्य कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाची तयारी केली जात आहे. परंतु या कार्यक्रमाला काही घटकांकडून विरोध केला जात आहे. 25 ऑगस्ट रोजी अमेरिकेच्या सिटी हॉलमध्ये इंडियन-अमेरिकेन मुस्लिम काऊन्सिलशी (IAMC) संबंधित धार्मिक संघटनांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली आणि सरसंघचालकांच्या कार्यक्रमाला विरोध केला. असे असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर यांनी या कार्यक्रमाचे उद्दीष्ट स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
सुनिल आंबेकर यांनी एक्स या समाजमाध्यमावर एक ट्वीट केले आहे. या ट्विटमध्ये मोहन भागवत यांचा न्यूयॉर्कमध्ये कार्यक्रम का होत आहे? त्यामागचा उद्देश काय? हे स्पष्ट केले आहेयुनिव्हर्सल ओनेस सेलिब्रेशन हा न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्यात आलेला एक आंतरधर्मीय सोहळा आहे. विविध संस्कृती, समुदाय आणि धर्मांच्या लोकांना एकत्र आणणारा हा उपक्रम आहे. या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत वेगवेगळ्या धर्माच्या, वेगेवगळ्या संस्कृतीच्या उपस्थितांशी संवाद साधणार आहेत, असे आंबेकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये सांगितले आहे.
The Universal Oneness Celebration in New York exemplifies an interfaith gathering where RSS Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat ji will communicate with a diverse, multicultural, and multi-faith audience. Organized in the spirit of open dialogue and mutual respect, the event…
— Sunil Ambekar (@SunilAmbekarM) August 26, 2026
तसेच, खुल्या संवादाची आणि परस्पर आदराची भावना जपत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम भारतीय संस्कृतीच्या सर्वसमावेशक आणि सर्वांना आपलेसे करणाऱ्या विचारांचे प्रतिबिंब आहे. विविध समुदायांमध्ये संवाद साधून परस्पर समज, सहकार्य आणि समान उद्दिष्टांची भावना निर्माण करण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भारतासह जगभरातील दीर्घकालीन परंपरा या उपक्रमातून पुढे नेली जात असल्याचेही त्यांनी ट्वीटमध्ये सांगितले.
शेवटी त्यांनी RSS ची विचारसरणी आणि कार्यदृष्टी जाणून घेण्यास इच्छुक असलेल्या सर्वांना या खुल्या संवादाच्या व्यासपीठावर सहभागी होण्याचे आमंत्रण आहे दिले आहे.
Leave a Reply