• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पत्नी नको त्या अवस्थेत दिसली, थेट प्रियकरासोबतच लावून दिलं लग्न, नवऱ्याने तो निर्णय का घेतला

August 26, 2026 by admin Leave a Comment


Love And Marriage Problem : प्रेम आणि लग्न याचा फार जवळचा संबंध आहे. प्रेम असलेल्या व्यक्तीसोबतच लग्न झाल्यास संसार सुखाचा होतो. पण प्रेमात अपयश आल्याने अन्य व्यक्तीशी लग्न करावे लागल्यावर मात्र आयुष्य फार कठीण होऊन जाते. याच कारणामुळे नंतरचा संसार खूपच कठीण होऊन जातो. संसारात सुख तर मिळतच नाही पण आपल्या पती, पत्नीलाही त्याचा त्रास भोगावा लागतो. सध्या असाच एक अजब प्रकार समोर आला आहे. नव्याने लग्न झालेल्या एका तरुणाला त्याची बायको तिच्या प्रियकरासोबत दिसून आली. त्यानंतर मात्र असं काही घडलं की त्याची चर्चा संपूर्ण देशात होत आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार समोर आलेला हा प्रकार उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातील चिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीने पत्नीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहाथ पकडल्याचा आरोप आहे. या घटनेनंतरचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यात पतीनेच आपल्या बोयकोचे तिच्या प्रियकरासोबत लग्न लावून दिले आहे.

पीडित पतीचा विवाह 24 जून रोजी मध्य प्रदेशातील भांडेर येथील तरुणीसोबत झाला होता. लग्नानंतर दोन-तीन आठवड्यांनी पत्नी चहा, दूध किंवा जेवणातून पतीला झोपेच्या गोळ्या देत असल्याचा आरोप पतीने केला आहे. पती झोपल्यानंतर ती आपल्या प्रियकराशी संपर्क साधत असल्याचे त्याचे म्हणणे आहे. तब्येत वारंवार बिघडू लागल्याने पतीला संशय आला.

19 ऑगस्ट रोजी परिसरातील नागरिकांनी पत्नीचा प्रियकर घरी आल्याची माहिती पतीला दिली. पत्नीने हा आरोप नाकारला. त्यानंतर 23 ऑगस्ट रोजी पतीने दोघांना कथितरित्या रंगेहाथ पकडले. पतीच्या आरोपानुसार, यावेळी प्रियकराने त्याच्यासोबत मारहाण केली आणि गळा दाबण्याचाही प्रयत्न केला. पत्नीनेही त्याचे हात पकडल्याचे पतीने सांगितले. आरडाओरड ऐकून शेजारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पतीची सुटका केली. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्रियकर महिलेला कुंकू लावताना दिसत आहे. विशेष म्हणजे दोघांनीही एकमेकांना वरमाला घातल्याचे दिसत आहे. या प्रकरणाची माहिती झाशी पोलिसांच्या मीडिया सेलने ‘एक्स’वर दिली आहे. महिलेचे प्रियकरासोबत प्रेमसंबंध असून ती त्याच्यासोबत राहू इच्छित असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही पक्षांना पोलिसांनी कौटुंबिक न्यायालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
  • मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
  • मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
  • नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
  • पत्नी नको त्या अवस्थेत दिसली, थेट प्रियकरासोबतच लावून दिलं लग्न, नवऱ्याने तो निर्णय का घेतला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in