
प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात सुख, शांती आणि आनंदाचे वातावरण असावे असे वाटते. यासाठी कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम, आपुलकी आणि एकोपा टिकवून ठेवणे गरजेचे असते. यासोबतच घरातील वास्तू जपणे देखील महत्त्वाचे असते. विशेषतः घरात फॅमिली फोटो लावताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. हे फोटो केवळ तुमचे घर सजवत नाहीत, तर घराच्या वास्तूशास्त्रावरही परिणाम करतात. कुटुंबात प्रेम, एकता आणि सकारात्मक वातावरण टिकवून ठेवण्यासाठी वास्तूशास्त्रानुसार फॅमिली फोटोंशी संबंधित हे 10 वास्तू नियम जाणून घ्या.
घरात फॅमिली फोटो लावताना हे 10 वास्तू नियम ठेवा लक्षात
नैऋत्य दिशा निवडा
वास्तुशास्त्रानुसार फॅमिली फोटो ठेवण्यासाठी नैऋत्य दिशा सर्वोत्तम मानली जाते. ही दिशा स्थिरता, सामर्थ्य आणि आर्थिक समृद्धी दर्शवते. शिवाय ही दिशा पृथ्वी तत्वाचे प्रतीक मानली जाते. या दिशेत फॅमिली फोटो ठेवल्याने घरातील सदस्यांमधील नातेसंबंध अधिक दृढ होतात.
लिव्हिंग रूममध्ये लावा फोटो
लिव्हिंग रूममध्ये तुमच्या घरातील सदस्यांचा हसरा फोटो लावणे हा एक उत्तम पर्याय आहे. अशी भिंत निवडा जिथून घरातील सर्वांना तो फोटो सहज दिसेल.
घरातील मुलांचे फोटो पूर्व दिशेला लावा
घरात मुलांचे असे फोटो असतील ज्यात ते पदक, चषक किंवा एखादे बक्षीस घेतलेलं, तर असे फोटो घराच्या पूर्व दिशेच्या भिंतीवर लावावेत. यामुळे मुलांच्या यशाची आणि कर्तृत्वाची आठवण कायम राहते.
ईशान्य कोपऱ्यात फोटो लावणे टाळा
ईशान्य दिशा ही घरातील एक पवित्र जागा मानली जाते . वास्तू तत्त्वांनुसार या ठिकाणी फॅमिली फोटोऐवजी पूजा किंवा आध्यात्मिक बाबींशी संबंधित फोटो लावावेत.
मुख्य दरवाजासमोर फोटो कधीच लावू नये
घरातील फॅमिली फोटो थेट मुख्य प्रवेशद्वारासमोर लावणे टाळा. ते अशा ठिकाणी लावा जिथून आत येताना ते थेट दिसणार नाहीत.
बाथरूमजवळ फोटो लावू नका
वास्तूनुसार शौचालय किंवा स्नानगृहाजवळील भिंतीवर कधीच फॅमिली फोटो लावणे योग्य मानले जात नाही. फोटो नेहमी स्वच्छ भिंतीवर लावावेत.
पलंगाच्या डोक्याशी फोटो ठेऊ नका
बेडच्या अगदी वर किंवा बेडरूममधील हेडबोर्डच्या भिंतीवर फॅमिली फोटोची जड फ्रेम लावणे टाळा. असे केल्याने मानसिक ताण किंवा जडपणाची भावना निर्माण होते, असे मानले जाते .
आनंदी फोटो निवडा
फॅमिली फोटोंमध्ये तुमच्या घरातील प्रत्येकजण आनंदी आणि निवांत दिसला पाहिजे. यामुळे सकारात्मक वातावरण टिकवून ठेवण्यास मदत होते.
तुटलेल्या किंवा खराब झालेल्या फ्रेम्स काढून टाका
जर फोटो फ्रेम तुटलेली, खराब झाली असेल तर ती ताबडतोब बदला. वास्तूनुसार तुटलेल्या वस्तू नकारात्मकतेशी संबंधित मानल्या जातात.
तुमच्या पूर्वजांचे फोटो वेगळे लावा
पूर्वजांचे फोटो कधीही जिवंत कुटुंबीयांच्या फोटोंसोबत एकाच फ्रेममध्ये किंवा त्यांच्या शेजारी लावू नयेत. वास्तुशास्त्रानुसार पूर्वजांच्या फोटोंसाठी एक स्वतंत्र जागा असावी आणि असे फोटो दक्षिण दिशेला लावावे.
त्यामुळे घरात फॅमिली फोटो लावण्यापूर्वी तुम्ही हे वास्तुनियम एकदा काळजीपूर्वक वाचले पाहिजेत.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Leave a Reply