• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Photo : लग्न मंडपातून थेट परीक्षा केंद्रात, नवरीच्या एका कृतीने सासू सासऱ्यांसह अख्ख्या गावाचं जिंकलं मन

April 29, 2026 by admin Leave a Comment


वाशिम जिल्ह्यातील भटउमरा येथील चि. सौ. का. वैष्णवी संतोष काळे हिचा विवाह आज सकाळी 11 वाजता येथीलच चि. ज्ञानेश्वर राजू चौधरी यांच्याशी आनंदात संपन्न झाला.

साधारण परिस्थितीतून आलेल्या या कुटुंबांनी सोहळा पार पाडत असतानाच वैष्णवीसमोर मोठे आव्हान उभे होते. ती रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात बीएसडब्ल्यू (BSW) द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी असून, तिचा महत्त्वाचा पेपर हाच दिवशी दुपारी 2 वाजता वाशिम येथील राजस्थान कॉलेज येथे नियोजित होता.

लग्न आणि परीक्षा एकाच दिवशी आल्याने कोणालाही गोंधळ उडाला असता मात्र वैष्णवीने शिक्षणाला प्राधान्य देत लग्नसोहळा आटोपताच वेळ न दवडता थेट परीक्षा केंद्र गाठले आणि आपला पेपर पूर्ण केला. तिच्या या निर्णयामुळे उपस्थित नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिक भारावून गेले होते.

माता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणासाठीच्या संघर्षमय कार्यातून प्रेरणा घेत वैष्णवीने हा धाडसी निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. तिच्या या कृतीमुळे परिस्थिती कोणतीही असो, शिक्षणाची वाट कधीही सोडू नये हा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचला आहे.

वैष्णवीच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत असून, इतर मुलींनीही शिक्षणाला प्राधान्य देत स्वतःच्या पायावर उभे राहावे, असा प्रेरणादायी संदेश या घटनेतून मिळत आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Indurikar Maharaj : 100 एकरवर आलिशान मंडप… जेवणाची रेलचेल… इंदोरीकर महाराजांच्या कन्येचा उद्या शाही विवाह सोहळा, मंडप पाहून डोळे दिपले
  • ‘2029 ची निवडणूक भाजप-शिवसेना स्वबळावर…’, संजय शिरसाटांचं महायूतीबाबत मोठं विधान
  • रणबीर कपूरच्या सर्वात हॉट अभिनेत्रीचा घटस्फोट, 5 वर्षांनी मोडला संसार, मुलांबद्दल मोठा निर्णय
  • पुणे हादरलं! नसरापूरमध्ये साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या; 65 वर्षीय नराधमाला अटक
  • तु मला कथा विचारतोय? वडिलांच्या भीतीमुळे स्क्रिप्ट न ऐकताच आमिरने साईन केलेले दोन चित्रपट, ठरले फ्लॉप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in