• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रणबीर कपूरच्या सर्वात हॉट अभिनेत्रीचा घटस्फोट, 5 वर्षांनी मोडला संसार, मुलांबद्दल मोठा निर्णय

May 2, 2026 by admin Leave a Comment


Ranbir Kapoor Actress Gets Divorced: बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेता रणबीर कपूर स्टारर ‘ये जवानी है दिवानी’ सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारलेल्या एवलिन शर्मा हिचं लवकरच घटस्फोट होणार आहे. लग्नानंतर अनेक वर्ष अभिनेत्री झगमगत्या विश्वापासून दूर होती. अशात तिच्या खासगी आयुष्यातील समोर आलेल्या बातमीनंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. एवलिन हिने ‘यारियां’ सिनेमात देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती. आता खुद्द एवलिन हिने खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे… शिवाय अभिनेत्रीने मुलांच्या भविष्याबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत एवलिन हिने खासगी आयुष्याबद्दल मौन सोडलं आहे. ‘आम्ही आमचं नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे. पण मुलांच्या भविष्याकडे आमच्या दोघांचं लक्ष असणार आहे… आमच्या गोपनियतेचा आदर करा…’, एवलिन पुढे म्हणते, ‘प्रयत्न करत आहोत की, सेपरेशन जितकं चांगलं होईल तितकं चांगलं आहे. आम्ही पुढे चांगले मित्र म्हणून राहू आणि मुलांचा देखील योग्यरित्या सांभाळ करु…. याच आधारावर आता नवीन अध्याय सुरु करणार आहोत…’, असं देखील अभिनेत्री म्हणाली.

एवलिन हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘साहो’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आल्यानंतर अभिनेत्री पुन्हा रुपेरी पडद्यावर दिसलीच नाही. तिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने, 2021 मध्ये इंडो-ऑस्ट्रेलियन डेंटल सर्जन तुशान भिंडी याच्यासोबत लग्न केलं. त्यांना दोन मुलं देखील आहे. पण मुलांच्या जन्मानंतर देखील त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

सांगायचं झालं तर, काही महिन्यांपूर्वी, एवलिन हिने इन्स्टाग्रामवर मुलांसोबत एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो प्रचंड सुंदर आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्री कॅप्शनमध्ये म्हणाली, ‘कधी – कधी मला असं वाटतं की, मी सर्वकाही चुकीचं करत आहे आणि कधी कधी असं वाटतं की, मी एक सुपरहीरो आहे… पण अधिक दिवस, मी स्वतःला थकलेली आणि पूर्णपणे प्रेमात बुडालेली अनुभवते…’, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त एवलिन हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुम्हाला माहिती आहे 20 रुपयांच्या नोटेवरील सुंदर Beach चे रहस्य ?
  • कार-बाईक चालकांनो सावधान! टायर्ससाठी असलेला ‘5 वर्षांचा नियम’ तुम्हाला माहिती आहे का?
  • जिओच्या ग्राहकांना सुगीचे दिवस, 200 रुपयांपेक्षा स्वस्त 2 प्लॅन लॉन्च, मिळणार खास फायदे
  • 20 वर्षांचे होम लोन 13 वर्षांतच संपवा, ChatGPT ने सांगितल्या कर्जमुक्तीच्या 3 जबरदस्त ट्रिक्स
  • GT vs PBKS Live Streaming : गुजरात पंजाबचा हिशोब करत सहावा सामना जिंकणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in