• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तु मला कथा विचारतोय? वडिलांच्या भीतीमुळे स्क्रिप्ट न ऐकताच आमिरने साईन केलेले दोन चित्रपट, ठरले फ्लॉप

May 2, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमधील ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा आमिर खानने अलीकडेच एक रंजक खुलासा करत आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील दोन मोठ्या निर्णयांबद्दल सांगितले आहे. विशेष म्हणजे, त्याने त्याच्या कारकिर्दीत फक्त दोनच चित्रपट असे केले होते, जे त्याने स्क्रिप्ट न ऐकता साइन केले होते आणि हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले.

आमिर खानची ओळख नेहमीच विचारपूर्वक आणि वेगळ्या विषयांवरील चित्रपट निवडणारा अभिनेता अशी राहिली आहे. मात्र, सुरुवातीच्या काळात त्याने काही निर्णय स्वतःच्या मनाऐवजी परिस्थितीमुळे घेतले होते. स्टँडअप कॉमेडियन जाकिर खान यांच्यासोबत झालेल्या संवादात आमिरने या अनुभवांबद्दल सविस्तर चर्चा केली.

आमिर म्हणाला की, तो कोणताही चित्रपट निवडताना नेहमी त्याच्याशी भावनिकदृष्ट्या जोडले जाणे त्याच्यासाठी महत्त्वाचे असते. मी जेव्हा एखादी कथा ऐकतो, तेव्हा एक सामान्य प्रेक्षक म्हणून विचार करतो. जर ती कथा मला भावली, त्यात काहीतरी नवीन वाटले आणि ती मला उत्साहित करते, तेव्हाच मी त्या चित्रपटात काम करण्याचा किंवा तो प्रोड्यूस करण्याचा निर्णय घेतो असे त्याने स्पष्ट केले.

मात्र, अव्वल नंबर आणि तुम मेरे हो हे दोन चित्रपट असे होते, जे त्याने स्क्रिप्ट न ऐकता स्वीकारले. यामागचे कारण म्हणजे त्याचे वडील आणि निर्माते ताहिर हुसैन. आमिरने सांगितले की, तो वडिलांचा खूप आदर आणि थोडी भीतीही बाळगत होता. त्यामुळे त्यांच्या शब्दाला नकार देणे त्याच्यासाठी शक्य नव्हते.

स्क्रिप्ट न ऐकातच साईन केले दोन चित्रपट

‘अव्वल नंबर’बद्दल सांगताना आमिर म्हणाला की, वडिलांनी त्याला फोन करून सांगितले होते की दिग्दर्शक देव आनंद त्याला भेटू इच्छित आहेत आणि त्यांनी आधीच आमिरकडून होकार दिला आहे. आमिरने सुरुवातीला स्क्रिप्ट ऐकण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण वडिलांनी त्याला स्पष्ट सांगितले की कोणतीही चौकशी न करता फक्त होकार द्यायचा. वडिलांच्या भीतीमुळे आमिरने तो निर्णय मान्य केला.

दुसरा चित्रपट ‘तुम मेरे हो’ होता, ज्याचे निर्माते स्वतः ताहिर हुसैन होते. या चित्रपटासाठी आमिरने वडिलांकडे कथा विचारण्याचा प्रयत्न केला पण त्यांना उलट उत्तर मिळाले. आम्ही 30 वर्षांपासून चित्रपट बनवत आहोत आणि तू मला कथा विचारतोस? असे वडिलांनी त्याला सुनावले. या घटनेनंतर आमिरने तीन तासांचे लेक्चर ऐकले आणि शेवटी हार मानत स्क्रिप्ट न ऐकता चित्रपटासाठी होकार दिला.

आमिरने विनोदी शैलीत म्हटले की, माझ्या इतर ज्या चित्रपटांबद्दल तुम्हाला आवड नाही, त्यासाठी तुम्ही मला जबाबदार धरू शकता. पण हे दोन चित्रपट मी स्क्रिप्ट न ऐकताच केले होते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याच्या भावात पुन्हा वाढ, आज 10 ग्रॅमसाठी…
  • IPL 2026: राजस्थान रॉयल्स प्लेऑफच्या शर्यतीत गॅसवर! दिल्लीकडून पराभव होताच धाकधूक वाढली
  • Helmet Safety Tips : हेल्मेटलाही असते एक्सपायरी डेट ? किती वर्षांनी बदलावं ? क्लीनिंग टिप्सही घ्या जाणून
  • मिसाईल हल्ल्याची भीती! अचानक मोबाइलवर आलेल्या अलर्टने नागरिकांमध्ये भीती, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
  • रितेशचा राजा शिवाजी चित्रपट नेमका कसा, 9 शब्दात लावला निकाल; दिग्गज दिग्दर्शकाच्या एका प्रतिक्रियेमुळ तुफान उठलं!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in