
भारतीय संस्कृतीमध्ये सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना प्रचंड महत्त्व दिले जाते. सणासुदीला किंवा आनंदाच्या क्षणांच्या वेळी सोने खरेदी करण्याची जुनी परंपरा आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेल्या सोन्याचे भाव पाहून सर्वसमान्यांना ते खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागत असल्याचे चित्र आहे.
आज पुन्हा एकदा जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाली आहे. त्यामुळे खरेदी करताना सर्वसमान्यांना पुन्हा विचार करावा लागणार आहे.
सोन्याच्या दरात 1 हजार 200 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 47 हजार 290 हजार रुपयांवर पोहोचले आहे.
तर दुसरीकडे चांदीच्या दरात 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे एक किलो चांदीचा भाव जीएसटीसह 2 लाख 31 हजार 750 रुपयांवर पोहोचला आहे.
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)




Leave a Reply