
निसर्गाच्या प्रकोप नेपाळमध्ये बघायला मिळाला. मोठा पूर नेपाळमध्ये आला. या पुरात सर्वकाही वाहून गेले. लोकांची घरे गेली. अजूनही बचावकार्य सुरू आहे. 2000 पेक्षा अधिक लोक बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा 600 च्या वर पोहोचला आहे. भारतात 3 प्रेत वाहून आलीत. नेपाळमधील स्थिती अत्यंत भीषण आहे. चिखलातून लोकांना काढले जात आहे. अनेक व्हिडीओ नेपाळमधील पुढे आली. तिथे परिस्थिती किती जास्त भयंकर होती आणि अजूनही आहे हे दिसतंय. नेपाळला मदतीकरिता भारत पुढे आला. भारतीय लष्कराचे विमाने नेपाळला मदत घेऊन तात्काळ पोहोचले. भारताने बचाव कार्यात मदत करण्याचाही प्रस्ताव दिला. भारतासोबतच इतरही देश नेपाळच्या या वाईट काळात मदतीकरिता धावून आले. नेपाळमध्ये किती मोठा प्रकोप निसर्गाने केला, त्यानंतर स्थिती काय आहे हे व्हायरल व्हिडीओवरून कळतंय.
30 देशांचे नागरिक बेपत्ता आहेत. काही भारतीय नागरिकांसोबतही संपर्क होऊ शकला नाही. ज्यांच्यासोबत संपर्क झाला, त्यांना सुरक्षित भारतात आणले जात आहे. त्यातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल झाला. या व्हिडीओत अचानक मोठ्या प्रमाणात पाणी वाहून येताना दिसत आहे. मोठा पूर आला. तिथे असलेले एक दोन मजली घर पहिल्याच झटक्यात या पाण्यासोबत थेट वाहून जाताना दिसत आहे.
पाणी इतक्या जास्त वेगाने आले की, घर कोसळले. पाण्याचा वेग प्रचंड होता. त्याचाच बाजूला काही लोक उभी आहेत. त्यात एक आई आणि दोन शाळेतून आलेल्या मुली दिसत आहेत. हे पाहून क्षणाचाही विचार न करता आई आपल्या मुलींच्या हाताला पकडते आणि पळत वर घेऊन येते. यादरम्यान सुरूवातीला ही आई रस्त्यावर पडतेही. हे सर्वजण डोंगरावर पळून येताना दिसत आहेत. दोन चिमुकल्या मुली आपल्या आईच्या हाताला धरून पळत आहेत.
Sirf 2 second ki deri hoti, maa apni dono betiyon ke saath paani mein sama jaati. pic.twitter.com/Fzy2a2RBy5
— Maratha Newz (@Maratha_NEWz) August 29, 2026
शाळेतून आलेल्या या मुली दिसत असून शाळेचा गणवेश आणि आयकार्ड त्यांच्या गळ्यात दिसत आहे. क्षणाचाही उशीर झाला असता तर मोठा अनर्थ झाला असता. यासोबतच नेपाळच्या पुरामध्ये एक ग्रीन हाऊस तूफान चर्चेत आले. या घराच्या आजुबाजूचे घर पुरात वाहून गेले. फक्त एक दोन मजली ग्रीन मजली घर सुरक्षित राहिले. पहिल्या मजल्याला नुकसान झाले.
Footage Shows How Family Trapped Inside Nepal’s Blue House Was Rescued
GANESH SHRESTHA pic.twitter.com/YX3NiDyoqW
— Viral Stringer (@StringerViral) August 29, 2026
या घरातील लोक मदत मागताना दिसत होते. चारही बाजूने पाणीच पाणी. त्यातच शेजारचे घर पुरात वाहून गेले. ग्रीन घराचे व्हिडीओ तूफान व्हायरल झाली. आता याच घरातील लोक सुरक्षित राहिले की, नाही असा सवाल लोक उपस्थित करत होते. आता याचा एक व्हिडीओ पुढे आला. या घरातून लोकांना बचाव पथकाकडून सुरक्षितपणे बाहेर काढले जात आहे, हे दिसत आहे.
GANESH SHRESTHA
Leave a Reply