• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रितेशचा राजा शिवाजी चित्रपट नेमका कसा, 9 शब्दात लावला निकाल; दिग्गज दिग्दर्शकाच्या एका प्रतिक्रियेमुळ तुफान उठलं!

May 2, 2026 by admin Leave a Comment


रितेश देशमुखचा महत्त्वाकांक्षी ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’ 1 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने दणदणीत सुरुवात केली आहे. रितेश देशमुखने स्वतः लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय केलेल्या या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आता प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा देखील ‘राजा शिवाजी’चे फॅन झाले आहेत.

राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, रितेश चित्रपटगृहात कमाल करत असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेतील रितेशच्या अभिनयाचे कौतुक करताना म्हटले की, “रितेश खरोखरच शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म वाटत आहे.”

Hey @geneliad CONGRATS on the way your #RajaShivaji is both SLASHING and SMASHING the BOXOFFICE .. @Riteishd both as DIRECTOR and ACTOR is creating MAYHEM in the THEATRES and he literally looks #ShivajiMaharaj REINCARNATED 🙏💪🔥

— Ram Gopal Varma (@RGVzoomin) May 1, 2026

राम गोपाल वर्मा यांनी केलं कौतुक

राम गोपाल वर्मा यांनी ‘एक्स’वर (ट्विटर) लिहिले, “जिनिलिया, तुझा चित्रपट ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे, त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन! रितेश दिग्दर्शक आणि अभिनेता अशा दोन्ही रूपांत थिएटरमध्ये खळबळ माजवत आहे. तो खरोखरच शिवाजी महाराजांच्या पुनर्जन्मासारखा दिसत आहे.”

‘राजा शिवाजी’चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन

इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’च्या प्राथमिक अहवालानुसार, ‘राजा शिवाजी’ने भारतात पहिल्या दिवशी ६,१९२ शोमधून ११.३५ कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले आहे. या चित्रपटाने मराठी आवृत्तीत ८.०० कोटी, तर हिंदी आवृत्तीत ३.३५ कोटी रुपयांची कमाई केली. महाराष्ट्रात सांगलीमध्ये सर्वाधिक ऑक्युपन्सी नोंदवण्यात आली, त्यापाठोपाठ पुणे, मुंबई आणि नाशिकचा क्रमांक लागतो.

चित्रपटाबद्दल काही खास गोष्टी

‘राजा शिवाजी’ सिनेमामध्ये रितेश देशमुखने मुख्य भूमिका साकारली असून, यात अभिषेक बच्चन, जिनिलिया देशमुख, संजय दत्त, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी आणि अमोल गुप्ते यांसारख्या दिग्गज कलाकारांची फौज आहे. हा ऐतिहासिक चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुरुवातीच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित झाला आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुम्हाला माहिती आहे 20 रुपयांच्या नोटेवरील सुंदर Beach चे रहस्य ?
  • कार-बाईक चालकांनो सावधान! टायर्ससाठी असलेला ‘5 वर्षांचा नियम’ तुम्हाला माहिती आहे का?
  • जिओच्या ग्राहकांना सुगीचे दिवस, 200 रुपयांपेक्षा स्वस्त 2 प्लॅन लॉन्च, मिळणार खास फायदे
  • 20 वर्षांचे होम लोन 13 वर्षांतच संपवा, ChatGPT ने सांगितल्या कर्जमुक्तीच्या 3 जबरदस्त ट्रिक्स
  • GT vs PBKS Live Streaming : गुजरात पंजाबचा हिशोब करत सहावा सामना जिंकणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in