• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Parth Pawar: धक्कादायक! पार्थ पवारांचा VSR कंपनीच्या विमानातूनच प्रवास, आता काय दिलं स्पष्टीकरण?

April 29, 2026 by admin Leave a Comment


Parth Pawar VSR Aviation: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा बारामती विमानतळाजवळ विमान अपघातात मृत्यू झाला. VSR कंपनीचे विमान 28 जानेवारी 2026 रोजी कोसळले. त्यानंतर या कंपनीविरोधात काहूर उठले. आमदार रोहित पवार यांनी या कंपनीच्या कारभाराचे वाभाडे काढले. अनेक व्हिडिओ समोर आले. त्यांनी विमान अपघात नसून घातपात असल्याचा आरोप केला. त्याची चार पत्रकार परिषद घेत याप्रकरणी अनेक धक्कादायक गोष्टी समोर आणल्या. तर विमान अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी ते आक्रमक झाले. हे सर्व प्रकार घडत असतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि दादांचे चिरंजीव खासदार पार्थ पवार यांनी VSR कंपनीच्या विमानातून प्रवास केल्याचे समोर आले आहे. आता या मुद्दावर पार्थ पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी याविषयीचे ट्वीट केले आहे.

का केला व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास?

VSR कंपनीच्या विमानातून खासदार पार्थ पवार यांनी प्रवास केला. त्यावरून काहूर उठल्यानंतर आता त्यांनी या विमानातून प्रवास का केला याविषयी ट्वीटमधून माहिती दिली आहे. “मोदी बाग, पुणे येथे पवार साहेबांना भेटण्यासाठी तातडीने पोहोचायचे असल्याने मी माझ्या कार्यालयाला विमानाची व्यवस्था करण्यास सांगितले होते. शेवटच्या क्षणी झालेल्या व्यवस्थेमुळे नकळतपणे VSR Aviation चे विमान माझ्यासाठी बुक करण्यात आले. विमानतळावर पोहोचेपर्यंत आणि विमानापर्यंत जाईपर्यंत हे विमान VSR Aviation चे असल्याची मला कोणतीही कल्पना नव्हती.” असे स्पष्टीकरण खासदार पार्थ पवार यांनी दिले आहे.

मोदी बाग, पुणे येथे पवार साहेबांना भेटण्यासाठी तातडीने पोहोचायचे असल्याने मी माझ्या कार्यालयाला विमानाची व्यवस्था करण्यास सांगितले होते. शेवटच्या क्षणी झालेल्या व्यवस्थेमुळे नकळतपणे VSR Aviation चे विमान माझ्यासाठी बुक करण्यात आले. विमानतळावर पोहोचेपर्यंत आणि विमानापर्यंत…

— Parth Sunetra Ajit Pawar (@parthajitpawar) April 28, 2026

विमान बुक करणाऱ्या एजंटशी केलेला करार रद्द

ही केवळ प्रशासकीय पातळीवरील चूक होती. याची मी गंभीर दखल घेतली असून संबंधित विमान बुक करणाऱ्या एजंटशी असलेला करार आम्ही तत्काळ रद्द करत आहोत. तसेच माझ्या कर्मचारीवर्गाला आणि सहकाऱ्यांना अशा प्रकारच्या चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी अधिक सतर्क राहण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.VSR Aviation बाबत यापूर्वीची आमची भूमिका आजही कायम आहे. आमचा स्पष्ट विरोध आहे आणि पुढेही तशीच राहणार आहे. यावरून निर्माण केला जाणारा वाद पूर्णपणे निराधार, दिशाभूल करणारा आणि दुर्दैवी आहे. सत्य परिस्थिती समजून न घेता यावर राजकारण करण्याचा प्रयत्न योग्य नाही, अशी प्रतिक्रिया खासदार पार्थ पवार यांनी दिली.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Video : बॅटमध्ये AI चिप असल्याचा आरोप, वैभव सूर्यवंशीने एका वाक्यात संपवला विषय
  • पोस्ट ऑफिसची NSC योजना, 5 वर्षांच्या गुंतवणुकीवर मिळवा 7.7 टक्के व्याज, जाणून घ्या सर्व नियम आणि फायदे
  • 690 किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, हुंडई आयोनिक 5 फेसलिफ्ट भारतात लाँच
  • मोठी बातमी! इराणमध्ये सत्तापरिवर्तन, मोजतबा खामेनेई यांच्याबद्दल हादरवणारी माहिती, जगभरात मोठी खळबळ
  • Motorola घेऊन येत आहे त्यांचा नवीन फोल्डेबल स्मार्टफोन, किंमत आणि दमदार फिचर्स झाले लीक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in