• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Pankaja Munde : ….तर पंकजा मुंडे थेट मुख्यमंत्री! आमच्या पक्षात आल्यास…नव्या ऑफरने एकच खळबळ!

August 3, 2026 by admin Leave a Comment


Pankaja Munde : भाजपाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या मंत्री पंकजा मुंडे यांनी भर सभेत एक विधान करून खळबळ उडवून दिली. त्यांनी मला राजकारणातून निवृत्त व्हावसं वाटतंय, अशी भावना बोलून दाखवली. त्यांच्या या विधानानंतर आता राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेस पक्षाने तर त्यांना थेट ऑफरच देऊन टाकली आहे. राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री व्हा, असा थेट प्रस्ताव काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. असे असतानाच आता पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री व्हावं, असा नवा प्रस्ताव काँग्रेसच्या नेत्या संगीता तिवारी यांनी ठेवला आहे.

पंकजा मुंडे या भाजपची वाघीण, पण…

गोपीनाथ मुंडे यांची मुलगी म्हणजे पंकजा मुंडे या भाजपची वाघीण आहेत. त्यांनादेखील भाजपात त्रास होतोय. त्या बाहेर पडण्याचा विचार करत आहेत. त्या वैतागल्या आहेत. भाजपामुळे बाहेरच्या महिला त्रस्त आहेत. पण यांच्या पक्षातल्या महिलादेखील त्रस्त असल्याचं समोर येतंय, असा हल्लाबोल संगीता तिवारी यांनी केला.

आमच्याकडे येऊन मुख्यमंत्री व्हावे

तसेच, पंकजा मुंडे जर काँग्रेसमध्ये आल्या तर आमची ताकद वाढेल. त्या खरंच राज्याच्या मुख्यमंत्री होऊ शकतात. विजय वडेट्टीवार जे बोलले त्या मताशी मी सहमत आहे, असं मोठं विधान त्यांनी केलं. पंकजा मुंडे वैतागल्या आहेत. रिटायरमेंट घेण्याचा विचार करण्यापेक्षा त्यांनी आमच्याकडे येऊन मुख्यमंत्री व्हावे. यासाठी विजय वडेट्टीवार हे राहुल गांधी यांच्याशी बोलतील, अशी खुली ऑफर त्यांनी पंकजा मुंडे यांना देऊन टाकली. काँग्रेस पक्षाचा त्यासाठी पाठिंबा असेल, असेही त्यांनी एका प्रकारे बोलून दाखवले.

मला लोकांच्या विकासासाठी…

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी सभेत बोलताना मला रिटायर व्हावसं वाटतंय. परंतु सभेतील लोकांना पाहून मला पुन्हा एकदा प्रोत्साहन मिळाले, उर्जा मिळाली. मला लोकांच्या विकासासाठी काम करायचे आहे, असं पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवलं.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in