• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Panjabrao Dakh weather update : नदी नाले एक होणार; पावसाची प्रतिक्षा संपणार, पंजाबराव डख यांचा नवा मान्सून अंदाज

June 14, 2026 by admin Leave a Comment


राज्यात मान्सूनच आगमन झालं आहे. मात्र अजूनही महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊसच झालेला नाही. शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागले आहेत. मान्सूनचा पाऊस झाला नसल्यानं पेरण्यांचा खोळंबा झाला आहे. राज्यात मान्सूनची वाटचाल ही संथ गतीने सुरू आहे. येत्या 15 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकेल असा अंदाज होता. परंतु मान्सूनची वाटचाल मंदावल्यानं येत्या 22 जून पर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे चांगल्या पावसासाठी अजूनही प्रतीक्षाच करावी लागणार आहे. जोपर्यंत चांगला पाऊस पडत नाही, तो पर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्याची घाई करू नये, असा इशाराही भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा मान्सूनच्या वाटचालीबद्दलचा नवा अंदाज समोर आला आहे. राज्यात सध्या पावसाचं प्रमाण असमान दिसून येत आहे, काही भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे, तर काही भागांमध्ये अजूनही पाऊस झालेला नाहीये. येत्या 13 तारखेपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल, परंतु तो विखुरलेल्या स्वरुपात असेल, म्हणजे काही ठिकाणी पडेल काही ठिकाणी पडणार नाही, एक दिवस पडले दुसऱ्या दिवशी पडणार नाही, असं त्याचं स्वरुप असेल असा अंदाज डख यांनी वर्तवला आहे. येत्या 20 जून पर्यंत राज्यात अशीच स्थिती असेल असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यानंतर मात्र दोन जोरदार पावसाची शक्यता आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

पावसावर अल निनोचं सावट 

दरम्यान यंदाच्या पावसावर अल् निनोचं सावट आहे, त्यामुळे चिंता वाढली आहे. सुरुवातीला हवामान विभागाकडून देशात सरासरी 92  टक्के इतका पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र आता सुधारीत अंदाजानुसार देशात यंदा पावसाचं प्रमाण सरासरीच्या केवळ 90  टक्के इतकचं राहण्याची शक्यात आहे. यंदा देशासह राज्यातील अनेक भागांमध्ये कमी पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने तयारीला सुरुवात केली आहे. तसेच शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sanjay Jadhav : इच्छा नसताना मला..ठाकरेंचे फुटलेले खासदार संजय जाधव यांची प्रामाणिक कबुली
  • Venezuela Earthquake : जमीन थरथरली, इमारती कोसळल्या; रस्त्यावर लोकांची धावपळ, भूकंपाचे ५ भयंकर व्हिडिओ पाहून हादरा बसेल
  • Ketan Agarwal Murder Case : ‘मुलीलाही संपवा आता..’, केतन अग्रवाल मर्डर केसवरून भडकली अभिनेत्री
  • Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट, चेतन चौधरीच्या वडिलांचा धक्कादायक दावा, माझा मुलगा त्या वेळी…
  • Farmer Loan Waiver: 56 लाख शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! प्रतिक्षा संपली…येणार कर्जमाफीचा मॅसेज, 2019 मधील कर्जमाफीतील शेतकर्‍यांना ही मिळणार लाभ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in