• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Pakistan Missile : पाकिस्तानला असं एक घातक मिसाइल बनवण्यात यश आलय जे..भारताला जास्त अलर्ट होण्याची गरज

April 17, 2026 by admin Leave a Comment


पाकिस्तानी नौदलाने स्वदेशी बनावटीच्या अँटी शिप बॅलेस्टिक मिसाइलची यशस्वी चाचणी केली आहे. युद्धनौकेवरुन ही मिसाइल डागली जाते. दूर अंतरावरील लक्ष्यभेद करण्याची या मिसाइलची क्षमता आहे. पाकिस्तानी नौदलाची तयारी आणि अचूक हल्ल्याची क्षमता यातून दिसते. मिसाइलने दूर अंतरावरील लक्ष्याचा अचूक वेध घेतला. या मिसाइल टेस्टच्यावेळी पाकिस्तानी नौदलाचे प्रमुख एडमिरल नवेद अशरफ स्वत: उपस्थित होते. त्यांच्यासोबत देशाचे प्रमुख वैज्ञानिक आणि इंजिनिअर होते. मिसाइल डागल्यापासून लक्ष्यभेद होईपर्यंत सर्वांनी ही चाचणी पाहिली. पाकिस्तानने स्वबळावर ही मिसाइल विकसित केली आहे. यात आधुनिक नॅविगेशन सिस्टिम आहे. रस्त्यामध्ये दिशा बदलण्याची या मिसाइलची क्षमता आहे. शत्रूपासून असलेला धोका कमी करणं, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणं आणि अचूक हल्ला करणं सोपं होऊन जातं.

या मिसाइलमुळे समुद्रातील जहाजं आणि जमिनीवरील लक्ष्यावर अचूकतेने प्रहार शक्य आहे. या मिसाइलमध्ये अत्याधुनिक टेक्नोलॉजी आहे. सर्व धोके टाळून सर्व ठिकाणी अचूक प्रहार करता येतो. पाकिस्तानने सुद्धा अशा प्रकारची टेक्नोलॉजी मिळवल्याच यातून दिसून येतं. यामुळे पाकिस्तानी समुद्री सुरक्षा अजून मजबूत होणार आहे. मिसाइलच्या यशस्वी चाचणीसाठी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी, पंतप्रधान शहबाज शरीफ, चीफ ऑफ डिफेंस फोर्सेज आणि आर्मी चीफ जनरल आसिम मुनीरसह सर्व प्रमुखांनी वैज्ञानिकांचं कौतुक केलं आहे.

भारताने पाकिस्तानचा बचाव पूर्णपणे भेदून टाकला

याआधी नोव्हेंबर 2025 मध्ये या मिसाइलची चाचणी करण्यात आली होती. आता दुसऱ्यांदा यश मिळाल्यामुळे पाकिस्तानी नौदल आपली क्षमता अजून बळकट करत असल्याचं यातून दिसून येतं. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने आपली सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यावर जास्त लक्ष दिलं आहे. कारण ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानचा बचाव पूर्णपणे भेदून टाकला होता. भारताने आत खोलवर घुसून हल्ले केले होते. पाकिस्तानला भारताचं एकही मिसाइल रोखता आलं नाही. पण भारताने पाकिस्तानची सर्व बॅलेस्टिक, क्रूझ मिसाइल्स रोखली होती.  भारत आता युद्ध पातळीवर मिशन सुदर्शन चक्रवर काम करत आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उन्हाळ्यात कलिंगडाची सालं म्हणजे त्वचेसाठी वरदान, तुमच्या स्किन केअर रूटिनमध्ये अशाप्रकारे करा समावेश
  • नाशिक IT प्रकरणात नवा ट्विस्ट! फरार निदा खान या ठिकाणी लपल्याचा दावा, जामीन अर्ज दाखल करत म्हणाली…
  • 60 हजारांत हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर, ओला ते हिरोपर्यंत ‘हे’ आहेत दमदार पर्याय
  • IPL 2026: मुंबई इंडियन्स संघात धुसफूस? पराभवानंतर हार्दिक पांड्याचा संताप, कोणाला काढणार बाहेर?
  • रामायणाबद्दल प्रकाश राज असं काही म्हणाले, थेट FIR दाखल; बीफ खाण्याबद्दलही वादग्रस्त विधान

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in