भारत आणि आयर्लंड यांच्यात मालिका रंगली जी आयर्लंड संघाने जिंकली. आयर्लंडसाठी ही ऐतिहासिक बाब ठरली. आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघावर सर्वत्र टीका होत आहे. नुकतेच कर्णधारपद स्वीकारलेल्या श्रेयस अय्यरची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. भारतीय संघाने एकूण तीन वेळा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. अशा संघावर आयर्लंडने पराभव करावा अशी वेळ यावी म्हणजे […]
Vladimir Putin : युक्रेन भारी पडतोय, व्लादिमीर पुतिन यांची पहिल्यांदाच मोठी कबुली
युक्रेन विरुद्ध सुरु असलेल्या युद्धात रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पहिल्यांदाच मोठी कबुली दिली आहे. युक्रेन रशियाच्या आत खोलवर हल्ले करत असून रशिया अडचणींचा सामना करत असल्याचं पुतिन यांनी मान्य केलं. आम्ही आमच्या सीमा सुरक्षित करु, या आव्हानावर मात करु असं पुतिन बोलले. युनायटेड रशिया पार्टी काँग्रेसमध्ये पुतिन बोलत होते. रशियन इन्फ्रास्ट्रक्चर आणि ऊर्जा तळांवरील […]
थलपती विजय ‘जन नायकन’च्या निर्मात्यांवर का मेहेरबान? थेट दिल्लीत मोठं पद; भाजप-डीएमकेकडून टीका
तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनल्यानंतर थलपती विजय हे एकानंतर एक महत्त्वाचे निर्णय घेताना दिसत आहेत. तमिळनाडू सरकारने आता ‘जन नायकन’ या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक के. व्यंकट नारायण यांची नवी दिल्लीत राज्य सरकारचे विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. ‘जन नायकन’ हा विजय यांच्या करिअरमधला शेवटचा चित्रपट आहे. निवडणूक लढवण्यापूर्वीच त्यांनी याचं शूटिंग संपवलं होतं. मात्र या […]
बीडच्या विलास घुले खून प्रकरणाला धक्कादायक वळण, थेट पीडितेचे गंभीर आरोप, खासदार पूत्र..
बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि त्यांचा मुलगा साैरभ बजरंग सोनवणे यांचे नाव थेट विलास घुले खून प्रकरणात आल्याने एकच खळबळ उडाली. एसआयटीकडून साैरभ बजरंग सोनवणे याची काही तास चाैकशी देखील झाली. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीत यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला. विलास घुले खून प्रकरणानंतर एकच मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात मोठी माहिती पुढे येतंय. विलास घुले […]
Sunil Gavaskar : वैभव सूर्यवंशीच्या मुद्यावरुन सुनील गावस्कर भडकले, सरळ बोलले आता इंग्लंडमध्ये तरी..
वैभव सूर्यवंशीची सिनियर टीम इंडियात निवड झाली तेव्हा सर्वांना असं वाटलेलं की, आयर्लंड विरुद्ध T20 सीरीजमध्ये त्याला डेब्यूची संधी मिळेल. वैभवचं वय 15 वर्ष आहे. वैभवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केला असता, तर सचिन तेंडुलकरचा 36 वर्षांपासूनच रेकॉर्ड मोडीत निघाला असता. पण आयर्लंड दौऱ्यात असं होऊ शकलं नाही. बेलफास्टमध्ये सीरीज सुरु होण्याच्या पूर्वसंध्येलाच टीम इंडियाचे बॅटिंग […]
TET पेपर फुटला महाराष्ट्रात, कनेक्शन या चार राज्यात, तिसऱ्या राज्याचं नाव आल्याने सर्वच चक्रावले; पोलिसांची पथके रवाना
महाराष्ट्र टीईटी परीक्षा 28 जून 2026 रोजी विविध परीक्षा केंद्रांवर होणार होती. मात्र, परीक्षेच्या केवळ एक दिवस आधी महाराष्ट्र टीईटी पेपरफुटी झाल्याचे वृत्त आता समोर येत आहे. विविध माध्यमांच्या वृत्तानुसार, परीक्षेच्या अवघ्या 24 तास आधी ठाण्यात पेपरफुटी झाली. या पेपरफुटीनंतर शिक्षण विभागाने आता शिक्षक पात्रता परीक्षा रद्द केली आहे. महाराष्ट्र टीईटी पेपरफुटीची तक्रार पोलिसांकडे करण्यात […]