• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?

September 8, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याने लासलगाव आणि पिंपळगावातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. बाजारपेठेत कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. सध्या पिंपळगावात कांद्याला ६,६०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत आहे, तर लासलगावात ५,००० रुपये प्रति क्विंटलचा उच्चांकी भाव नोंदवला गेला आहे.

मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक घटल्यामुळे बाजारभावात ही वाढ झाल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नवीन लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होईपर्यंत हे दर चढे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, कांद्याच्या वाढलेल्या दरामुळे देशांतर्गत शहरी भागातील ग्राहकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. केंद्र सरकारच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या बफर स्टॉकमधून दिल्ली, चेन्नई यासह विविध शहरांमध्ये ४,३५० मेट्रिक टन कांदा पाठवण्यात आलेला आहे. सरकारने १ लाख २१ हजार मेट्रिक टन कांदा १,२३५ रुपयांपासून २,३४५ रुपयांपर्यंतच्या दराने खरेदी केला आहे. हा कांदा शहरी भागातील नागरिकांना ३५ रुपये प्रति किलो दराने उपलब्ध करून दिला जात आहे. किरकोळ बाजारातील कांद्याच्या वाढलेल्या दरापासून शहरी भागातील नागरिकांना दिलासा देण्याचा हा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • डिमार्टची सर्वात मोठी ऑफर, फक्त 90 रुपयात मिळणार… तुफान गर्दी, फायदाच फायदा..
  • Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
  • Ashish Nehra : टीम इंडियाचा कोच बनणार आशीष नेहरा? म्हणाला मला आधी पत्नीची परवानगी घ्यावी लागेल
  • Narendra Modi Mumbai Security : बनावट आयडी, सोबतीला बंदूक, मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत नेमका घुसला तरी कसा? मुंबईत काय घोळ झाला?
  • Special story : दिशा सालियन 14 व्या मजल्यावरून कशी पडली? 8 जूनच्या रात्री नेमकं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in