• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

OBC Morcha : आज मुंबईत ओबीसींचा महामोर्चा धडकणार, लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वाखाली ओबीसींचा एल्गार

September 1, 2026 by admin Leave a Comment


अंतरवली सराटीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरु असतानाच आज मुंबईत ओबीसींचा महामोर्चा निघणार आहे. ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार असून ओबीसींना मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात असून ते संपून जाण्याची भिती आहे. म्हणून लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाची हाक देण्यात आली आहे. कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्या समाजाला आरक्षण देणार नाही ही सरकारची भूमिका आहे. सरकारने तसं अनेकदा सांगितलं देखील आहे. कुणबी समाज हा ओबीसीमध्ये येतो. ज्या मराठ्यांच्या जुन्या कुणबी नोंदी आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. ती सरकारने मान्य देखील केली आहे. पण जात पडताळणीत काही नोंदी रद्द झाल्या आहेत. यावर मनोज जरांगेंचा आक्षेप आहे. त्यासाठी त्यांचं आमरण उपोषण सुरु आहेत.

पुणे जिल्ह्यातील दौंड-पाटस येथील टोल नाक्यावरुन हा ओबीसी आक्रोश मोर्चा मुंबईच्या दिशेने निघणार आहे.

(बातमी अपडेट होत आहे)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सुभाष चंद्रा यांच्या 22,000 कोटींच्या कर्जमाफी प्रकरणात नवीन ट्विस्ट, NCLT ने खोडला तो दावा, आता 5 सदस्यीय पूर्णपीठासमोर सुनावणी होणार?
  • Bangles Astrology: वार न बघता बांगड्या खरेदी करताय? थांबा, या दिवशी चुकूनही खरेदी करु नका
  • Hardik Pandya Photo: नेहमीप्रमाणे डॅशिंग लूक पण तरीही एका गोष्टीची भासतेय कमी, हार्दिकचा अवतार पाहून फॅन्स आश्चर्यचकित
  • सिनेमा असावा तर असा.. एका झटक्यात धुरंधर, टॉक्सिक, आवारापन 2 ला टाकलं मागे; कमावला तब्बल 2000 टक्के नफा
  • संपदा मुंडेनंतर त्याच फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टराने घेतला धक्कादायक निर्णय, वरिष्ठांवर..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in