
हार्दिक पांड्या शेवटचा भारतीय संघाकडून २०२६ च्या टी-२० विश्वचषकात खेळला होता. त्यानंतर तो आयपीएलमध्ये खेळला.
आयपीएल स्पर्धेदरम्यान हार्दिकला दुखापत झाली आणि तो पुनरागमन करू शकला नाही
र्दिक सध्या बंगळूरु येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पुनर्वसन उपचार घेत आहे. या दरम्यानचा त्याचा एक लूक आता व्हायरल होत आहे.
सध्या बंगळूरुमध्ये असलेला हार्दिक सोमवारी (३१ ऑगस्ट) पूर्व विभाग आणि मध्य विभाग यांच्यातील पहिला उपांत्य सामना पाहण्यासाठी गेला होता यावेळी त्याचा लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेने त्याचे काही फोटो शेअर केले, ज्यात त्याचा नवीन लूक समोर आला. हे फोटो सोशल मीडियावर झटपट व्हायरल झाले.
हार्दिक नेहमीच आपल्या स्टायलिश लूकसाठी नेहमीच चर्चेत राहतो. तो नेहमी वेगवेगळ्या हेअर स्टाईल करताना दिसतो , पण यावेळी त्याचा लूक जरी डेशिंग असला तरीही त्याचा डोक्यावर एकही केस नाही. पण तरीही तो इतका जबरदस्त दिसतोय की त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.





Leave a Reply