• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

NSA Ajit Doval : यावेळी चीन-पाकिस्तान नाही, तर भारताशेजारच्या छोट्या देशाला अजित डोवाल यांची डायरेक्ट वॉर्निंग, तुमच्या देशातून जर..

July 16, 2026 by admin Leave a Comment


फक्त चीन-पाकिस्तानमधून भारत विरोधी कारवाया चालत नाहीत, तर भारताच्या शेजारी अजून एक छोटा देश आहे, तिथून भारतविरोधी कारवाया सुरु असतात. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बुधवारी म्यानमारमधील आपल्या समकक्ष अधिकाऱ्याची भेट घेतली. यावेळी डोवाल यांनी म्यानमारला कठोर इशारा दिला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल बिम्सटेकच्या (BIMSTEC) राष्ट्रीय सुरक्षा प्रमुखांचाय पाचव्या बैठकीमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी म्यानमारचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यू टिन आंग सान यांची भेट घेतली. दोन्ही देशांच्या NSA नी भारत आणि म्यानमारमधील सुरक्षा सहकार्याची समीक्षा केली. क्षेत्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्यांवर विस्तृत चर्चा केली. या चर्चेचा फोकस भारत-म्यानमार सीमेच्या विद्यमान स्थितीवर होता.

कुठल्याही परिस्थितीत भारतविरोधी कारवायांसाठी म्यानमारच्या भूमिचा वापर होऊ नये असा स्पष्ट संदेश भारताने दिला आहे. म्यानमारच्या भूमिवर अनेक भारतविरोधी उग्रवादी संघटना आहेत. शस्त्रास्त्रांची तस्करी आणि सीमेपलीकडून होणारी घुसखोरी हे चिंतेचे विषय आहेत. दोन्ही देशांच्या बड्या अधिकाऱ्यांनी बॉर्डर सुरक्षा, परस्पर लष्करी सहकार्य वाढवणं या मुद्यांवर चर्चा केली. बिम्सटेकच्या या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परिषदेच्या बैठकीचा वापर भारत पूर्वेकडच्या देशांसोबत दहशतवाद रोखणं, मादक पदार्थांची तस्करी रोखणं, सायबर धोके आणि सीमा व्यवस्थापन समन्वय आणि सहकार्य वाढवण्यासाठी करत आहे.

पाकिस्तानला त्याची चांगली कल्पना

भारताची जवळपास 1,643 किलोमीटरची लांब सीमा म्यानमारला लागून आहे. भारताची उत्तर-पूर्वेकडची राज्य अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिजोरम या राज्यांची सीमा म्यानमारला लागून आहे. अजित डोवाल यांची भारताचं राष्ट्रीय सुरक्षा धोरण आखण्यात एक महत्वाची भूमिका आहे. सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक आणि ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानला त्याची चांगली कल्पना आहे. अजित डोवाल यांनी रॉ, आयबी मध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांना भारतासमोर असलेल्या सुरक्षा आव्हानांची चांगली कल्पना आहे. अजित डोवाल मागच्या 15 वर्षांपासून भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.  त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या संभाळल्या आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in