• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Nitin Gadkari: बेरोजगारी आणि गरिबी ही देशासमोरील मोठी आव्हानं, नितीन गडकरी यांचा सरकारला घराच आहेर, म्हणाले काय?

September 12, 2026 by admin Leave a Comment


Nitin Gadkari Big Statement: आपल्या अथांग लोकसंख्येमुळे बेरोजगारी आणि गरिबी ही अजूनही देशासमोरील मोठी आव्हाने आहेत असे मोठे वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. एकीकडे केंद्र सरकार देशात रोजगार निर्मिती, मोठा विकास केल्याचा दावा करत असताना गडकरी यांचा हा सरकारला घरचा आहेर मानला जात आहे. दरम्यान आपले केंद्र सरकार पाणी, वीज, वाहतूक आणि दळणवळण यांसारख्या पायाभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देत आहे असेही त्यांनी सांगितले.

काय म्हणाले गडकरी?

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, पूल आणि अनेक प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला असला तरी विकासकामे सुरूच आहेत, आज मी कार्यक्रमाला एक तास उशिरा आलो याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि भारताला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे, असे गडकरी म्हणाले.

5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे स्वप्न

अमेरिका तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगात आघाडीवर असून भारत-अमेरिका धोरणात्मक सहकार्याची ही योग्य वेळ आहे. भारत-अमेरिका सहकार्यामुळे दोन्ही देशांसाठी ‘विन-विन’ परिस्थिती निर्माण होईल. उद्योग क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उद्योजकांचा सन्मान आणि प्रोत्साहन महत्त्वाचे आहे.देशाच्या सर्वांगीण विकासासाठी मजबूत पायाभूत सुविधा अत्यंत आवश्यक आहेत. पाणी, वीज, वाहतूक आणि दळणवळण या पायाभूत सुविधांना केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. भारत ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे, असे मंत्री गडकरी यांनी मुंबई- इंडो-अमेरिकन कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड्स 2026 सोहळ्यात सांगितले.

बेरोजगारी व गरिबी कमी होण्यास मदत होईल

भविष्यातील विकासासाठी ज्ञान हे सर्वात महत्त्वाचे साधन असून ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करणे गरजेचे आहे. भारतातील तरुण आणि प्रतिभावान इंजिनिअर्स, विशेषतः सॉफ्टवेअर इंजिनिअर्स, ही देशाची मोठी ताकद आहे. भारत-अमेरिकेतील उद्योग, उद्योजक आणि इतर घटकांमध्ये सहकार्य, समन्वय आणि संवाद वाढवणे आवश्यक आहे. उद्योजक हे केवळ संपत्ती निर्माण करणारे नसून रोजगार निर्माण करणारेही आहेत. उद्योजकतेला चालना मिळाल्याशिवाय भांडवली गुंतवणूक आणि उद्योगांचा विस्तार शक्य नाही. उद्योग वाढल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि बेरोजगारी व गरिबी कमी करण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रिटायरमेंटच्या 5 दिवस आधी IAS अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
  • मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात…
  • Nitin Gadkari: बेरोजगारी आणि गरिबी ही देशासमोरील मोठी आव्हानं, नितीन गडकरी यांचा सरकारला घराच आहेर, म्हणाले काय?
  • Ameesha Patel: अमीषा पटेलच्या आईच्या घरातून लाखोंचे दागिने गायब; मोलकरणीला अटक, नेमकं काय घडलं?
  • रोहित शर्मा खोटारडा.. विराट कोहलीचे चाहते भडकले, हिटमॅनच्या दाव्याने वाद वाढला, थेट..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in