• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

NH-44 ब्लॉक, एसपीसह 6 पोलीस जखमी, बाजारबंद, तिकिट कापल्यावर भाजपमध्ये इतकं होतं नाही, पण यावेळी..

July 11, 2026 by admin Leave a Comment


सध्या देशातील ज्या-ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे, तिथे-तिथे कुठलीही निवडणूक असली, तरी भाजपकडून तिकीट मिळवण्यासाठी स्पर्धा पहायला मिळते. प्रत्येकालाचा तिकीट देणं शक्य होत नाही, तेव्हा उमेदवाराचा संताप, नाराजी, नेतृत्वावर आरोप हे आपण अनेकदा टीव्हीवरुन पाहिलय. पण मध्य प्रदेशात तर एक वजनदार नेत्याचं तिकीट भाजपने कापलं म्हणून त्याच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरुन नॅशनल हायवे-44 ब्लॉक केला होता. अगदी काही वेळातच या विरोध प्रदर्शनाने हिंसक रुप धारण केलं. पोलिसांवर दगडफेक सुद्धा झाली. यात दतियाचे एसपी मयूर खंडेलवाल आणि अतिरिक्त एसपी सह 6 पेक्षा जास्त पोलीस गंभीररित्या जखमी झाले. मध्य प्रदेशच्या दतियामध्ये विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपकडून काल तिकीटाची घोषणा झाल्यानंतर मोठा वाद, राडा पहायला मिळाला. माजी गृहमंत्री आणि मध्य प्रदेशातील वजनदार नेते नरोत्तम मिश्रा यांच्या समर्थकांनी हा राडा घातला. त्यांचं विधानसभा पोटनिवडणुकीचं तिकीट कापण्यात आलं.

काल संध्याकाळी 6 वाजल्यापासून जवळपास 3000 पेक्षा जास्त उपद्रवी दतिया शहरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी जबरदस्ती बाजार बंद केले आणि नॅशनल हायवे वर चक्का जाम केलं अशी माहिती दतियाचे एसपी मयूर खंडेलवाल यांनी दिली. याच हायवे वर जवळपास 15 किलोमीटरची लांब रांग लागली होती. शेजारी जिल्ह्यातील वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम झाला. एसपी आणि कलेक्टर यांनी आंदोलकांना वारंवार रस्ता मोकळा करुन देण्याचं आवाहन केलं. पण ते ऐकले नाहीत. सकाळी 4 च्या सुमारास उपद्रवींनी अचानक पोलीस टीमवर दगडफेक केली.

इतरांना सरेंडर करण्याचा इशारा

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर दगडफेक अजून वाढली. या हल्ल्यात एसपी, एडिशन एसपीसह 6 पोलीस गंभीररित्या जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलय. त्यानंतर पोलिसांनी आणखी एकदा अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. बळाचा वापर करुन उपद्रवींना पळवून लावलं. काहींना ताब्यात घेतलं. इतरांना सरेंडर करण्याचा इशारा दिला.

पोटनिवडणूक का लागली?

2023 मध्ये मध्य प्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेस नेते राजेन्द्र भारती यांनी तत्कालीन गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना 7500 पेक्षा अधिक मतांनी पराभूत केलं. याच वर्षी एप्रिल महिन्यात दिल्लीतील एका न्यायालयाने राजेंद्र भारती यांना फसवणुकीच्या एका प्रकरणात तीन वर्ष कैदेची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा झाल्यामुळे राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द झाली. त्यामळे दतिया सीटवर विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. इथे 30 जुलैला मतदान होणार असून 3 ऑगस्टला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in