
निसर्ग कोपला तर किती भयंकर आहे, काय विनाश होऊ शकतो ते नेपाळमधल्या पुराने दाखवून दिलय. निसर्गाचं रौद्र रुप काल जगाने अनुभवलं. पाण्याचं विक्राळ रुप दिसलं. जलप्रलय कशाला म्हणतात, त्याने काय घडू शकतं ते काल दिसलं. भक्कम इमारती, घरं, हॉटेल, रस्ते, पूल एका क्षणात उद्ध्वस्त झाले. गावच्या गावं या पुरात वाहून गेली. पाण्याच्या अजस्त्र लोंढ्यापुढे जे आलं, ते दुसऱ्याक्षणाला गायब झालं. जशी वेळ पुढे सरकतेय तसं नेमकं या पुराने काय गिळलय? किती विनाश घडवलाय? त्याचं चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागलं आहे. कल्पनेपलीकडचं नुकसान या पुरामध्ये झालय. नेपाळमध्ये काल 26 ऑगस्टला ना मुसळधार पाऊस कोसळत होता, ना वादळ होतं. मात्र, तरीही अचानक आलेल्या पुराने सर्व होत्याचं नव्हतं झालं.
नेपाळमध्ये हा पूर अचानक का आला? त्याच्या वेगवेगळ्या थिअरी मांडल्या जात आहेत. पण नेमकं हे का घडलं? निसर्गात काय बदल झाला? ते समजायला अजून थोडा वेळ लागेल. या पुराचं उगम स्थान तिबेटमध्ये आहे, एवढं मात्र नक्की. सध्या नेपाळमधल्या पुराचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असाच एक थरकाप उडवून देणारा व्हिडिओ समोर आला आहे. कुठल्यातरी कन्स्ट्रक्शन साइटवरचा हा व्हिडिओ आहे. नदी किनाऱ्यावर जवळ काम करणारे मजूर जीवाच्या आकांताने पळताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.
Ground level footage shows people running for their lives as a sudden flash flood tears through the Nepal–Tibet region pic.twitter.com/kTY1bg2HJJ
— Surajit (@surajit_ghosh2) August 26, 2026
चालता, चालता या मजुरांना अचानक नदीत पाण्याचा प्रचंड लोढा शिरताना दिसतो. जीव वाचवण्यासाठी हे मजूर सैरावैरा पळत आहेत.पाण्याचा धडकण्याचा तो आवाजही या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाला आहे. अत्यंत भयानक, अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ आहे. निसर्गाचं रौद्ररुप काय असतं, ते हा व्हिडिओ पाहिल्यावर समजेल.
Bencana dahsyat banjir bandang Nepal 26/8/2026.
Seluruh wilayah perbatasan Nepal-Tibet China luluh lantak, ratusan orang hilang termasuk para wisatawan.
—-
27 Agustus Gedung DPR Malam RUU Perampasan Aset pic.twitter.com/nfIP3zM2p6— Octa (@octajo__) August 26, 2026
पूर येण्याचं कारण काय?
काठमांडू विश्वविद्यालयाचे प्रोफेसर आणि ग्लोबल वॉर्मिंगचे संशोधक रिजन भक्त कायस्थ यांच्यामते हिमस्खलनामुळे तिबेटच्या केरुंग भागात लेंडे नदीचा मार्ग रोखला गेला. त्यामुळे भोटेकोशी आणि त्रिशुली नदीत अचानक पूर आला.त्यांनी हा प्राथमिक निष्कर्ष काढला आहे. हिमस्खलनामुळे लेंडे नदीचा प्रवाह थांबला. त्यामुळे लेंडे नदीत एक कुत्रिम तलाव तयार झाला. तिथे मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालेलं. हा हिमनदी जेव्हा फुटली, तेव्हा भोटेकोशी आणि त्रिशुला नदीत पूर आला. काठमांडू पोस्टने हे वृत्त दिलं आहे.
Leave a Reply