• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Tukaram Mundhe: आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेच नंबर 1, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना मागं टाकलं, काय घडलं?

August 27, 2026 by admin Leave a Comment


Tukaram Mundhe FDA: महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासनात आपल्या कडक शिस्तीसाठी जे ओळखले जातात ते अधिकारी म्हणजे तुकाराम मुंढे. तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची आता सोशल मीडियावरही जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. इन्स्टाग्राम असो वा ‘X’ (ट्विटर), फॉलोअर्सची संख्या आणि पोस्टवर मिळणारा डिजिटल प्रतिसाद पाहिला तर  मुंढेंचा प्रभाव अधिक ठळकपणे समोर येत आहे. राजकीय नेत्यांपेक्षा मुंढे यांची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत. अन्न व औषध प्रशासाचे आयुक्त पद जेव्हा पासून त्यांनी सांभाळले आहे तेव्हापासून ते चर्चेचा विषय बनला आहे. अगदी कमी कालावधीत त्यांनी आपल्या कामाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

कमी पोस्ट्स आणि प्रचंड प्रतिसाद यामुळे तुकाराम मुंढे हे केवळ एक अधिकारी राहिले नाही, तर सोशल मीडियावरील एक मोठा ‘डिजिटल ब्रँड’ ते बनले आहेत. अनेक लोक त्यांच्या कार्यावर रिल बनवत आहे आणि सोशल मीडियावर शेअर करत आहे. त्यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी अनेक रिल स्टार त्यांच्यावर रिल, व्हिडिओ बनवत आहे. त्यांच्या फोटोंवर, व्हिडिओवर अनेक लाईक्स, कमेंट्सचा वर्षावही होत आहे.  त्यामुळे सोशल मीडिया रीच आणि एंगेजमेंट रेटमध्ये त्यांनी आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मागे टाकले आहे.

Instagram Data : इन्स्टाग्रामवर मुंढे ‘नंबर वन’!
इन्स्टाग्रामवरील आकडेवारीनुसार तुकाराम मुंढे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फॉलोअर्स आणि एंगेजमेंट या दोन्ही बाबतीत मागे टाकल्याचे समोर येत आहे

इन्स्टाग्राम फॉलोअर्स :
तुकाराम मुंढे : ३४ लाख १५ हजार
देवेंद्र फडणवीस : २९ लाख २ हजार
एकनाथ शिंदे : १३ लाख १ हजार

मागील 60 दिवसांतील पोस्ट्स :
तुकाराम मुंढे (१३),
देवेंद्र फडणवीस (९७),
एकनाथ शिंदे (२५).एंगेजमेंट रेट :
तुकाराम मुंढे : २०.३५ टक्के
देवेंद्र फडणवीस : ०.५० टक्के
एकनाथ शिंदे : ०.२४ टक्केX Platform Analysis : 
‘X’ (ट्विटर) वर राजकीय नेत्यांचे फॉलोअर्स अधिक असले तरी प्रतिसादाच्या बाबतीत मुंढेंची आघाडी जास्त असल्याचे दिसून येते.X फॉलोअर्स :
देवेंद्र फडणवीस (५.०२ लाख)
एकनाथ शिंदे (३.८७ लाख)
तुकाराम मुंढे (२.६५ लाख).

X एंगेजमेंट रेट :
तुकाराम मुंढे : ४.६२ टक्के
देवेंद्र फडणवीस : ०.०७ टक्के
एकनाथ शिंदे : ०.०४ टक्के

ऑफिसर इन्स्टाग्राम फॉलोअर्स : 
तुकाराम मुंढे – ३४.१५ लाख
समीर वानखेडे – ८.४७ लाख
विश्वास नांगरे पाटील – ६.१२ लाख.

इन्स्टाग्राम एंगेजमेंट : 
तुकाराम मुंढे – २०.३५%
विश्वास नांगरे पाटील – ३.६०%
समीर वानखेडे – ३.२०%.

तुकाराम मुंढे यांचे अधिकृत व्हेरिफाइड फेसबुक पेज उपलब्ध नसल्याने फेसबुकच्या आकडेवारीची थेट तुलना करता येत नाही. पण जी आकडेवारी उपलब्ध आहे त्यावरुन एक गोष्ट स्पष्ट दिसते. फॉलोअर्सची संख्या एक गोष्ट असली तरीही आणि त्या फॉलोअर्सचा प्रत्यक्ष प्रतिसाद मिळवणं हे महत्त्वाचे आहे. अनेकांनाकडे मोठ्या संख्येने फॉलोअर्स असतील  पण तुकाराम मुंढेंच्या पोस्टवर एंगेजमेंट रेट (Engagement Rate) मोठ्या प्रमाणात दिसत आहे. नेते विरुद्ध अधिकारी या तुलनेत सोशल मीडिया एंगेजमेंटचं हे गणित तुकाराम मुंढेंच्या बाजूने वळलेले दिसत आहे.

आज सोशल मीडिया हा केवळ मनोरंजनाचा भाग राहिला नसून, अन्न-औषध प्रशासन असो, आरोग्य असो, शिक्षण असो किंवा नागरिकांच्या रोजच्या जीवनाशी संबंधित कोणताही प्रश्न असो या सर्व गोष्टींची माहिती यावरु प्राप्त करता येते.   प्रशासन आणि नागरिकांमधला संवादही आता सोशल मीडियावर सोपा झाला आहे. म्हणूनच एखाद्या अधिकाऱ्याच्या कामाची चर्चा होणं यापेक्षा त्याच्या कामाला मिळणार प्रतिसाद महत्त्वाचा आहे. जो तुकाराम मुंढे यांनी मागील काही दिवसांपासून सतत मिळत आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आव्हान देऊ नका, अडचणीत याल… संजय राऊत यांचा सरनाईक यांना इशारा
  • IND vs SL: आता तातडीने बदल होणार… टीम इंडिया जिंकण्याच्या उंबरठ्यावर, तरीही कोचने असं विधान का केलं?
  • MPSC पेपर फुटी प्रकरणात महत्वाची अपडेट; संचालकासह किती जणांना घेतलं ताब्यात?
  • ‘गजिनी’ फेम असिनच्या लेकीला पाहिलंत का? ओणमच्या निमित्तने शेअर केले खास फोटो
  • Nepal flash flood Reason: पावसाचा एक थेंबही नाही, तरीही नेपाळमध्ये महाप्रलय! खरं कारण आलं समोर?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in