
नेपाळच्या जलप्रलयाने अनेकांना हादरवून सोडलं आहे. घर, संसार, मुलंबाळं सर्वच या पुराने हिरावून घेतलं. त्यामुळे अनेकांच्या जगण्याचा आधार तुटला आहे. सात दिवस झाले तरी नेपाळमधील नागरिकांच्या डोळ्यातील अश्रू थांबता थांबत नाहीये. अनेक लोक आपल्या प्रियजनांचा कसोशीने शोध घेत आहेत. अशातच काही चमत्कारासारख्या घटनाही घडताना दिसत आहेत. काही लोक आश्चर्यकारक रित्या वाचल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. एक 97 वर्षाची महिला चार तास ढिगाऱ्याखाली होती. ही महिला वाचली. पण आता ती वारंवार एकच प्रश्न विचारत आहे. तिच्या या प्रश्नाने सर्वच हेलावून गेले आहेत.
गुना माया बोहरा असं या 97 वर्षाच्या महिलेचं नाव आहे. जलप्रलय आल्यानंतर घरेदारे वाहून गेली. केवळ ढिगारा राहिला. या ढिगाऱ्यात ती अडकून पडली होती. नुवाकोटच्या देविघाट येथील नदीच्या किनारी ज्येष्ठ नागरिकांच्या देशभालीसाठी एक केंद्र तयार करण्यात आलं होतं. या केंद्राची पडझड झाली. महिला ग्राऊंड फ्लोअरला होती. ती तळमजल्यावरच ढिगाऱ्यात अडकली होती. चार तास ती या ढिगाऱ्याखाली अडकून होती.
थेट जेसीबीच आणली
महापुराचं पाणी ग्राऊंड फ्लोअर पर्यंत पोहोचलं होतं. जेव्हा पाणी ओसरलं तेव्हा रेस्क्यू टीमने तिथे मदतकार्य सुरू केलं. या तेव्हा ढिगाऱ्याखाली ही 97 वर्षीय महिला असल्याचं दिसून आलं. रेस्क्यू टीमने तिला अतिशय सुखरुपपणे बाहेर काढलं. तिला बाहेर काढण्यासाठी तिचे नातेवाईक जेसीबी घेऊन घटनास्थळी पोहोचले होते. पोलीस आणि सैन्याच्या मदतीने गुना मायाला बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर तिला लगेचच काठमांडूच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
एकच सवाल, उत्तर नाही
दरम्यान, या घटनेनंतर गुना मायाला जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. ती अतिशय कमी बोलत आहे. बोलताना ती थरथरून जात आहे. वारंवार ती एकच प्रश्न विचारत आहे. मला पाण्याने का मारलं? मला पाण्याने का मारलं? असा सवाल त्या वारंवार करत आहे. तिच्या या सवालाचं कुणाकडेच उत्तर नाही. सर्व अवाक होऊन तिच्याकडे बघत आहेत.
दरम्यान, नेपाळच्या महापुरात आतापर्यंत 1,243 लोकांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोक बेपत्ता आहेत. बेपत्ता लोकांचा अनेक ठिकाणी शोध घेतला जात आहे. कडे कपारी, सुरुंगांमध्ये डेडबॉडी सापडते का? याचा शोध घेतला जात आहे. तर या महापुरामुळे तिबेटमधील 100 लोक बेपत्ता आहेत.
Leave a Reply