• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मराठा समाजाच्या मागणीवर मंत्री पंकजा मुंडे यांचं महत्त्वाचं भाष्य; ओबीसी आंदोलनावर काय म्हणाल्या?

September 3, 2026 by admin Leave a Comment


मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे मागील 6 दिवसांपासून उपोषण करत आहेत. उपोषणामुळे जरांगे यांची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागात मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत जाऊन आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘मी दर तासांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलत आहे. शेवटी या गोष्टीला संविधानाच्या चौकटीत कसा न्याय देता येईल, याबाबत सरकार सकारात्मक आहे. तर दोन्ही समाजाच्या मुंबईत होणाऱ्या आंदोलनावर मुंडेंनी बोलणे टाळले. गणेशोत्सवात (Ganesh Festival) दोन्ही समाजाचे मुंबईत आंदोलन होण्याची शक्यता आहे. यावर त्यांनी म्हटलं की, याबाबत माध्यमांनी चिंता केल्याचे त्यांना सांगेल’.

भारतातील शेतकरी आनंदात असल्याचा पंकजा मुंडे यांचा दावा 

भारताच्या जीडीपीत (GDP) सुधारणा झाल्याने पंतप्रधान मोदींनी नागरिकांचं अभिनंदन केलं. त्यानंतर आज शरद पवारांनी जीडीपीवरून पंतप्रधान मोदींना टोला लगावला. यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘मला असं वाटतं की , शरद पवारांचं वक्तव्य मी ऐकलं नाही. मी निश्चित अभिमानाने सांगू इच्छित आहे की, आपला देश एका वेगळ्या प्रवासाला निघाला आहे. तो सकारात्मक प्रवास आहे. गेल्या 10 वर्षांतील चांगला विकास आहे. डोळ्यांनी विकास दिसत आहे. फक्त कागदावर दिसत नाही. अनेक राष्ट्रीय महामार्ग होत आहेत. राष्ट्रीय महामार्गांचं जाळं विनलं जात आहे. नाशिकला यायला देखील वंदे भारत आहे. प्रत्येक ठिकाणी भोगदे तयार केले जात आहे. वेगाने कामे होत आहेत. तिर्थक्षेत्रांचा विकास होत आहे. मुद्रा योजना राबवली जात आहे. आता नवीन पिढी कशी आनंदीत राहील, यासाठी मोदी प्रयत्न करत आहेत. शेतकरी आनंदात आहे. लाडकी बहि‍णींना (ladki Bahin Yojana ) आधार मिळत आहे. त्यांना लखपती दीदी बनवलं जात आहे. हे चांगल्या राष्ट्राचं लक्षण आहे’.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sunil Lahri: भावनेच्या भरात चूक झाली.., ‘रामायण’ फेम सुनील लहरी यांनी मागितली माफी; राखीच्या व्हिडीओवरून वाद
  • DJ विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापट यांना कॅमेऱ्यासमोरच हाणलं, नीलम गोऱ्हे यांचा संताप, शिंदे सेना जशाच तसे उत्तर देणार?
  • आता मुंबई-पुण्याला बिनधास्त वडापाव, बाकरवडी खायला जा… वैष्णव यांच्याकडून मुंबई- पुणे बुलेट ट्रेनची घोषणा
  • Vidyanand Bapat : डीजेविरोधात बोलताना विद्यानंद बापटला हाणलं, Tv9 मराठीशी बोलताना घडली घटना
  • विद्यानंद बापटांना मारहाण, सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या, अमित शाहांनाच फोन…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in