• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

NEET UG 2026 परीक्षेचा निकाल जाहीर, आर्यन गुप्ता आणि पंशुल बंसल अव्वल

July 16, 2026 by admin Leave a Comment


नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे एनटीएने नीट यूजी (NEET UG) 2026 चा निकाल जाहीर केला आहे. या मेडिकलच्या परीक्षेत पंजाबचा आर्यन गुप्ता आणि हरियाणाचा पंशुल बंसल संयुक्तपणे अव्वल आले आहेत. दोघांनाही प्रत्येकी 720 मार्कांपैकी 715 मार्क मिळाले आहेत. दोघांनीही घवघवीत यश मिळवल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच या परीक्षेत अनेक राज्यांमधील विद्यार्थी चमकले आहेत.

भारतातील 551 शहरे आणि विदेशातील 14 शहरातील 5440 सेंटर्समध्ये एकूण सुमारे 20 लाख उमेदवारांनी नीट यूजी परीक्षेला बसले होते. त्यातील 11.21 लाख उमेदवार अंडरग्रॅज्यूएट मेडिकल, डेंटल, आयुष आणि संबंधित प्रोग्राम्समध्ये प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. निकाल वेळेत घोषित करण्यात आला आहे. कारण उमेदवारांना मेडिकल प्रवेश आणि कौन्सिलिंगचं शेड्यूल वेळेवर चाललं पाहिजे, असं एनटीएने म्हटलं आहे. तसेच सर्व उमेदवारांचं निकालपत्र neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याचंही एनटीएने म्हटलं आहे.

58% हून अधिक महिला यशस्वी

देशातील प्रत्येक राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील 13 भाषांमध्ये उमेदवार परीक्षेला बसले होते. या परीक्षेत पास झालेल्यांमध्ये 58 टक्के महिला आहेत. यात नेत्रदीपक कामगिरी करणारे 17 ते 19 वयोगटातील उमेदवार आहेत. नीट यूजी 2026 परीक्षेला बसलेल्या 138 उमेदवारांनी 720 पैकी 690 हून अधिक अंक मिळवले आहेत. यातील 93 टक्के उमेदवार पहिल्यांदाच नीट यूजी परीक्षेला बसले होते. यातील 99 टक्के उमेदवार हे 17 ते 19 वयोगटातील आहेत.

सर्वाधिक गुण मिळवणारे उमेदवार

19 उमेदवारांनी 720 पैकी 700 हून अधिक गुण मिळवले आहेत.

1,492 उमेदवारांनी 650 आणि त्याहून अधिक गुण मिळवले आहेत.

10,160 उमेदवारांनी 600 आणि त्याहून अधिक गुण मिळवले आहेत.

90,780 उमेदावारांनी 500 आणि त्याहून अधिक गुण मिळवले आहेत.

कॅटेगिरीवाईज क्वालिफाय झालेले उमेदवार

जनरल: 2.91 लाख

ओबीसी-नॉन क्रीमी लेयर (OBC-NCL): 5.12 लाख

एससी (SC): 1.59 लाख

एसटी (ST): 63,716

जनरल-EWS: 95,026

PwBD: 3,666

पीडब्ल्यूडी: 303

महिलांनी पुरुषांना टाकलं मागे

सर्व क्वॉलिफाय झालेल्या उमेदवारांमध्ये 58 टक्के महिला आहेत. पुरुषांच्या तुलनेत क्वालिफाय करणाऱ्यांमध्ये महिला सर्वाधिक आहेत. या परीक्षेत सामिल झालेल्या 56.8 टक्के महिला क्वालिफाय झाल्या आहेत. तर क्वालिफाय करणाऱ्यांमध्ये पुरुष केवळ 55.1 टक्का आहे.

NEET UG मध्ये यूपीचं वर्चस्व

सर्व 28 राज्य आणि 8 केंद्र शासित प्रदेशात यशस्वी झालेल्या उमेदवारांमध्ये उत्तर प्रदेश अव्वल आहे. उत्तर प्रदेशातील 1.7 लाखहून अधिक उमेदवार यशस्वी झाले आहेत. तर लक्षद्वीपमध्ली 43 उमेदवार यशस्वी झाले आहे. राज्यातील टॉपर्समध्ये जिग्मेत यांगचन लामो (लडाख, 530 गुण), ध्रुव त्रिपाठी (अंदमान आणि निकोबार द्वीप समूह, 606 अंक) आणि फहमीदा अनीस (लक्षद्वीप, 573 गुण) आदींचा समावेश आहे.

8 राज्यातून टॉप 17 रँकर्स

देशातील आठ राज्यांमधील 17 टॉपर्सने 700 हून अधिक गुण मिळवले आहेत. तर 26 उमेदवारांनी 690 हून अधिक गुण मिळवले आहेत. टॉप रँक करणाऱ्या 138 उमदेवार देशातील 66 शहरांमधील आहेत. तर 705 हून अधिक गुण मिळवणारे टॉप 17 रँकर्स 8 राज्यातील आहेत. यात पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, तामिळनाडू आणि तेलंगणाचा समावेश आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in